1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे

Описание к видео 1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे

असे ओळखा गूळाचे योग्य प्रमाण जाळीदार अनारसे. तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसा तळेपर्यंत संपूर्ण कृती।
अनारसे म्हंटलं की ते सर्वानाच आवडतात पण ते फसतील की काय अशी भिती वाटते.. अनारसे चुकतात याचे कारण म्हणजे गूळाचे चुकीचे प्रमाण आणि तांदूळ कसा आहे आणि कसा भिजवला पाहिजे, जर गूळाचे प्रमाण जास्त झाले तर अनारसे तेलात विरघळतात आणि तांदूळ नवीन असतिल, किंवा जुने नसतील तर जाळीदार होत नाहीत.

या विडियो मधे अनारसे खुसखुशीत आणि जाळीदार होण्यासाठी गूळाचे योग्य कसे राहील हे पाहणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने न चुकता जाळीदार अनारसे तयार होतात.

Ingredients / साहित्य :-

Rice / तांदूळ 2 cups
Jaggery - 1 part of rice flour
गूळ - तांदूळ पिठी चा 1 भाग
Poppy seeds / खसखस
Oli for frying / तळण्यासाठी तेल

Ghee / साजूक तूप


अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स :-

1) तांदूळ जुने वापरावे, इंद्रायणी तांदूळ वापरू नये.

2) तांदूळ कमीत कमी 3 दिवस 3 रात्र संपूर्ण भिजत घालावेत

3) रोजच्या रोज तांदूळ मधील पाणी बदलावे

4) तांदूळ खूप कोरडा सुकवू नये किंवा अगदी ओला नसावा.

5) तांदूळ पीठ एकदम बारीक दळणे, आणि मैद्याचा चाळणी ने चालून घ्यावे

6) एका वाटीने तांदळाच्या पिठ 3 वाटी घेऊन त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यावा.

7) गूळ जास्त झाल्यास अनारसे तेलात विरघळतात.

8) पीठ मळायला खूप जड जात असल्यास थोडेसे साजूक तूप / केळी मिसळावे. ( खूप जास्त नको)

9) अनारसे तळताना मंद आचेवर तळून घ्यावेत आणि चाळणी वर निथळत ठेवावेत.


#जाळीदारअनारसे #खुसखुशीतअनारसे
#howtomakeanarasa #anarase #अनारसा

Комментарии

Информация по комментариям в разработке