Talathi Duties , talathi exam preparation in marathi 2018

Описание к видео Talathi Duties , talathi exam preparation in marathi 2018

Update INFO
   / @mpscupscguru  

talathi exam preparation in marathi

तलाठी म्हणजे काय ? तलाठी काय काम करतो ? 2018

गाव कामगार तलाठी(हिंदीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.

सुरुवात[संपादन]
दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल(हिंदीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पदाची स्थापना केली होती. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिंदीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केल्या गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली. शाहू महारांजांनी सन १९१८ मध्ये पगारी तलाठी पदाची नियुक्ती केली.
तलाठ्याची कर्तव्ये[संपादन]
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारांस देणे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेले संपादन याचे नोंदवहीत विवरण घेणे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रकांची सूची तयार करावी व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
कार्यक्षेत्र[संपादन]
सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक गाव कामगार तलाठी असतो. अशा गावाच्या समूहास हिंदीत सजा अथवा साझा असे म्हटले जाते. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील सर्वसाधारणपणे १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке