Manoj Jarange Vs Laxman Hake : वडीगोद्रीत Maratha-OBC आंदोलक समोरासमोर, तणाव कशामुळे निर्माण झाला?

Описание к видео Manoj Jarange Vs Laxman Hake : वडीगोद्रीत Maratha-OBC आंदोलक समोरासमोर, तणाव कशामुळे निर्माण झाला?

#BolBhidu #ManojJarangePatil #MarathaReservation

१७ सप्टेंबरपासून मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषण पुकारलंय. जरांगेनी पुकारलेलं हे सहावं आमरण उपोषण आहे. यावेळी जरांगेंनी उपोषणाला बसताना विधानसभा निवडणुकीआधी सरकारला शेवटची संधी असल्याचं सांगत, जरांगेंनी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार, असा इशारादेखील दिलाय. तर दुसरीकडे वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेत. त्यामुळे या दोघांनी पुकारलेल्या उपोषणामुळे सरकारची मात्र चांगलीच कोंडी झालीये. अशातच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी काही मराठा आंदोलक वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे निघाले होते. पण वडीगोद्री या गावात पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं.

अंतरवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. यावेळी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले. तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वडगाव गोद्री येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पण नेमका मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये तणाव कशामुळे निर्माण झाला. जरांगे यांनी उपोषण पुकारल्यापासून नेमकं काय घडलं, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची नेमकी भुमिका काय आहे पाहुयात ह्या व्हिडिओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке