Karnala Fort | Chh. Shivaji Maharaj Forts and History

Описание к видео Karnala Fort | Chh. Shivaji Maharaj Forts and History

कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.सन १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला.

किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे किल्ला वेगळा वाटतो. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. भवानी मंदिराच्या जवळच ढासळलेल्या अवस्थेतील एक वाडा आहे.

गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.
#KarnalaFort #karnala bird sanctuary

Комментарии

Информация по комментариям в разработке