ढिसाळनियोजन व लाभार्थ्यांना अपुरापुरवठयामुळे,कामगार कल्याणमंडळाच्याबांधकाम कामगारासाठीयोजनेचाबोजवारा

Описание к видео ढिसाळनियोजन व लाभार्थ्यांना अपुरापुरवठयामुळे,कामगार कल्याणमंडळाच्याबांधकाम कामगारासाठीयोजनेचाबोजवारा

नंदुरबार येथे ढिसाळ नियोजन आणि लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तुंचा अपुरा पुरवठा यामुळे, कामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम कामगारासाठीच्या योजनेचा पुरता बोजवारा उडतांनाचे चित्र नंदुरबारमधून समोर आले आहे. या योजनेतंर्गत बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या सुरक्षासाहित्य पेटी आणि भांडी वाटपासाठी गेल्या तीन दिवसांपासून लाभार्थ्यांची झुंबड उडत आहे, यातूनच वस्तुचा लाभ मिळत नसल्याने थेट आता लाभार्थ्यांनी नाराजीतून नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट येथे रास्ता रोको करत रोष व्यक्त केल्याने, कामगार कल्याण महामंडळाचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे, कामगार कल्याण मंडळातर्फे 2019 पासून बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संचपेटी वाटपाची योजना राबविल्या जात आहे, तर गेल्या वर्षभरापासून सुरक्षा संचासोबतच आता भांडी वाटपाची योजनादेखील त्यात आणण्यात आली आहे, सन 2019 पासून जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 40 हजाराहूंन अधिक लाभार्थ्यांना कामगार सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले आहे, या पेटीत 14 प्रकारचे विविध साहित्याचा समावेश आहे, तर लोकसभा निवडणूकीआधी जवळपास दहा हजार लाभार्थ्यांना भांड्याचे वाटप करण्यात आले आहे, ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर राज्य स्तरावरुन या दोन्ही योजनांसाठी ठेकेदारांकडून साहीत्याचे वाटप करण्याचे काम करण्यात येत आहे, शहरातील कोरीट नाका परिसरात असणाऱ्या एका व्यापारी संकुलात नंदुरबारमधल्या वितरकाकडून लाभार्थ्यांना या योजनेतील लाभांच्या वस्तु देण्याचे काम गेल्या चार दिवासंपासून सुरु आहे, याचाच भाग म्हणून रविवारी या ठिकाणी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्यात आले, मात्र, रविवारी झालेल्या भांडे वाटपावेळी जिल्हाभरातून लाभार्थी वितरकाच्या या कार्यालय ठिकाणी गोळा झाल्याने, मोठा गदारोळ झाल्याचे पहावयला मिळाले, यावेळी महिला लाभार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते, या धक्काबुक्कीच्या घटनांची चर्चा रंगत असतांनाच आता काल पेटी वाटपाच्या नाराज लाभार्थ्यांनी थेट रास्ता रोको केल्याने, या कामगार कल्याण मंडळाचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे, पेटीचा लाभ घेण्यासाठी सकाळी चार वाजेपासून याठिकाणी जिल्हाभरातील लाभार्थी रांगेत उभे होते, मात्र सकाळापासून उपाशीतापाशी रांगांमध्ये उभे राहूनदेखील त्यांना सुरक्षा संचाची पेटी न मिळाल्याने, अखेर नाराज लाभार्थी महिलांनी थेट नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट परिसारात रास्ता रोको केला,
या अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी लाभार्थ्यांची समजुत काढत रास्ता मोकळा केला, मात्र, या आंदोलनामुळे या योजनेतील उडालेल्या नियोजनाचा बोजवारा समोर येतांना दिसत आहे, मुळात नंदुरबार जिल्ह्यातील दहा हजारांहुन अधिक लाभार्थ्यांची या सेशनमध्ये नोंदणी पुर्ण झाली आहेत, तर 50 हजारांहुन अधिक लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत, अशातच राज्य स्तरावरुन येणाऱ्या लाभाच्या साहित्याचे प्रमाण लाभार्थ्यांच्या तुलनेत नगण्य आहे, तसेच स्थानिक साहित्य वाटप करणाऱ्या एजन्सीचेदेखील नियोजन शून्य असल्याचे यानिमित्ताने दिसून आले, परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काल लाभार्थ्यांनी गिरीविहार गेट परिसरात रास्ता रोको सुरु केल्याचे समजताच नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, पोलीस निरीक्षक आणि पथक घटनास्थळी दाखल झाले, संतप्त लाभार्थ्यांना समज दिली, त्यानंतर तालुका स्तरावर भांडे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले,
भांडे आणि पेटी वाटपाबाबत असलेल्या ढिसाळ नियोजनाबाबत नंदुरबार-धुळे येथील कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्या दवाखान्यात असल्याचे सांगण्यात आले, तसेच याबाबत अधिकची माहिती हवी असल्यास धुळे येथील कार्यालयात येण्याचे सांगितले, मात्र, दवाखान्यात असल्याने याबाबत अधिकचे बोलणे टाळले.

Комментарии

Информация по комментариям в разработке