INDIA आघाडी Avdhesh Prasad यांना Lok Sabha Deputy Speaker च्या निवडणुकीत उतरवून कोणते डाव साधते आहे?

Описание к видео INDIA आघाडी Avdhesh Prasad यांना Lok Sabha Deputy Speaker च्या निवडणुकीत उतरवून कोणते डाव साधते आहे?

#BolBhidu #LoksabhadeputySpeaker #AvdheshPrasad

आता सरकारला पुन्हा एकदा नव्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. यावेळी परीक्षा आहे लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी. लोकसभेचे उपाध्यक्ष हे विरोधी बाकांवरील असावेत असा एक संकेत आहे. पण, पदाची ताकद आणि महत्त्व लक्षात घेता आणि सरकारकडे असलेले बहुमत पाहता सरकार रिस्क घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. कारण अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. त्यामुळेचं लोकसभेच उपाध्यक्ष पद देखील NDA मधील घटक पक्षांकडेच राहील याची काळजी भाजप घेतांना दिसतोय. तर, सरकारला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याच ठरवलं आहे. आणि विरोधी आघाडीचा उमेदवार म्हणून नाव पुढ आलं आहे अवधेश प्रसाद याचं.

हे तेच अवधेश प्रसाद आहेत ज्यांनी फैदाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंग यांचा पराभव केला आहे. याचं महत्त्व यासाठी आहे की अयोध्यानगरी याच मतदारसंघात येते. त्यामुळे भाजपचा अयोध्येत पराभव करणाऱ्या खासदाराला लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवून काँग्रेस आणि इंडिया सरकारला मेसेज देऊ पाहत आहे. पण, हा मेसेज नक्की आहे काय? इंडिया आघाडीने अवधेश प्रसाद यांच्याच नावाची निवड का केली आहे? इंडिया आघाडी आणि सरकार दोघांसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे? आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे लोकसभा उपाध्यक्ष पदाच नक्की किती महत्त्व आहे? पाहूयात या व्हिडीओतून..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке