Vidhan Parishad Election मध्ये BVA ची तीन मतं निर्णायक, Hitendra Thakur किंगमेकर ठरलेत का ?

Описание к видео Vidhan Parishad Election मध्ये BVA ची तीन मतं निर्णायक, Hitendra Thakur किंगमेकर ठरलेत का ?

#BolBhidu #HitendraThakur #VidhanParishadElectionResults2024

माझा रेकॉर्ड आहे मी जिथे असतो तो उमेदवार निवडून येतो, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी केली होती. त्यांचं हे विधान खरं ठरल्याची चर्चा होतीये, ती विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीत शरद पवारांचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

यात भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील का ? यावर शंका व्यक्त केली जात होती, मात्र भाजपनं ४ उमेदवार पहिल्याच पसंतीक्रमात तर सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीक्रमात निवडून आणलं. भाजपच्या या विजयात हितेंद्र ठाकूर यांच्या तीन आमदारांची मतं निर्णायक ठरल्याचं बोललं जातंय. हितेंद्र ठाकूर किंगमेकर कसे ठरले आणि किंगमेकर ठरत त्यांनी कसा डाव साधलाय, या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке