मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)

Описание к видео मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)

मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan) आम्ही मंडणगडला शॉपिंग करायला गेलो होतो. पाऊस जोरात लागत होता. शॉपिंग करून झाल्यावर आम्ही मंडणगडमध्ये मटण आणि चिकन खरेदी केले. मंडणगड एसटी स्टँड पासून जवळ असलेल्या मटन चिकन सेंटरमध्ये गावरान बोकडाचा मटण मिळतो. सातशे रुपये आता मटणाचा किलो आहे. आम्ही मटण खरेदी करून झाल्यावर जावळे गावी यायला निघालो. आमच्या अंजली काकी यांच्या माहेरी म्हणजे जावळे गावी आम्ही आलो. जावळे गाव हे आमच्या गावाच्या शेजारी असलेले गाव आहे. काकी जेवण खूप छान बनवतात. काकींच्या हातच्या वेगवेगळ्या रेसिपी आम्ही चाखल्या आहेत. काकींच्या हातची मटण सुक्का रेसिपी खास चुलीवर तयार केली. गावाला घराच्या मागे चुली असतात, चुलीवर मटण सुक्का खूप भारी बनतो. मटण चांगले स्वच्छ धुवून घेतले. एक किलो ताजे मटण आम्ही आणले होते. कांदा आणि खोबरा भाजून गोडामसाला तयार केला. गोडामसाल्यात गावरान पद्धतीने मटण सुक्का काकांनी चुलीवर घातला. घरगुती पद्धतीने चुलीवर मटण सुक्का कसा बनवतात ते काकांनी दाखवले. आम्ही जेवण तयार झाल्यावर सर्वजण एकत्र पंगतीने जेवायला बसलो. काका काकी त्यांची मुलं आणि मित्र वैभव आणि मी आम्ही पोटभर जेवलो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काकींच्या हातचा चुलीवरचा मटण सुक्का दाखवला आहे. आम्ही मंडणगडमध्ये जाऊन मटण खरेदी केले ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लैक्झ शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MandangadVarunAnaleTajeMutton #KakinchyaHatachaMuttonSukka #MuttonSukkaRecipe #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке