"चाफा बोलेना": एक अध्यात्मिक रसग्रहण! प्रा.अरविंद मानकर

Описание к видео "चाफा बोलेना": एक अध्यात्मिक रसग्रहण! प्रा.अरविंद मानकर

चाफा बोलेना *

चाफा बोलेना, चाफा चालेना |
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ||

गेले आंब्याच्या बनी,
म्हटली मैनासवे गाणी |
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे |

गेले केतकीच्या बनी,
गंध दरवळला मनी |
नागासवे गळाले देहभान रे |
चल ये रे, ये रे गडया,
नाचू उडू घालू फुगडया |
खेळू झिम्मा झिम पोरी ,
झिम पोरी झिम ||

हे विश्वाचे आंगण ,
आम्हा दिले आहे आंदण |
उणे करु आपण दोघे जण |
जन विषयाचे किडे ,
ह्यांची धाव बाह्याकडे |
आपण करु शुद्ध रसपान रे |
चाफा फुले आला फुलून ,
तेजी दिशा गेल्या आटून ,

कोण मी चाफा,
कोठे दोघे जण रे ||

कवी बी
#एक आध्यात्मिक रसग्रहण
#चाफा बोलेना या गीताचे रसग्रहण
#लय भारी आम्ही कोल्हापुरी
#प्रा.अरविंद मानकर

Комментарии

Информация по комментариям в разработке