murrah buffalo Dairy Farming : दुप्पट उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुर्रा जातीच्या म्हशी

Описание к видео murrah buffalo Dairy Farming : दुप्पट उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुर्रा जातीच्या म्हशी

#murrah #buffalo #murrahbuffaloes #dairyfarm #farming
आंध्र प्रदेशच्या नेल्लोरचे दुग्ध उत्पादक शेतकरी सांगतात कीकी मुर्रा म्हशी जास्त दूध देतात, म्हणून त्या जास्त फायदेशीर ठरतात. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मते, मुर्रा म्हशीच्या संगोपनासाठी लागणारा खर्च कमी असतो, त्यामुळे त्यांचं पालन जास्त फायदेशीर ठरतं. काही शेतकरी म्हणतात, मुर्रा म्हशींच्या संगोपणासाठी मजूर न लावता सर्व कामं स्वत: केली तर जास्तीत जास्त कमाई करता येते. आंध्र प्रदेश पशुसंवर्धन विभागाने मुर्रा म्हशींच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केलं आहे.
सरकार फक्त मुर्रा जातीच्या मादी बछड्यांचं प्रजनन करण्यासाठी एक विशेष योजना राबवत आहे.
पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनुसार, या मुर्रा जातीच्या म्हशी 1970च्या दशकात हरियाणामधून आंध्र प्रदेशला आणल्या गेल्या होत्या.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке