प्राचीन विराट नगरी _ वाईचा पांडवगड | Pandavgad Fort

Описание к видео प्राचीन विराट नगरी _ वाईचा पांडवगड | Pandavgad Fort

पांडवगड ! वाई ऊर्फ विराटनगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, केंजळगड, अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाई जवळ आले की, सारी दुर्गशिखरे त्यांच्या माना वर करत डोकाऊ लागतात. यातच त्यांच्या विशिष्ठ आकाराने उठून दिसतो तो पांडवगड.
.
पांडवगडाचा इतिहास पाहिल्यास समजते की पांडवगडही शिलाहार राजा भोजची निर्मिती! साधारणपणे इसवी सन ११७८ ते ९३ दरम्यान याला हे गडाचे रूप दिले गेले. पुढे यादव, विजयनगर, आदिलशाही इथे आली. छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६७३ हा गड स्वराज्यात आणला. त्यानंतर औरंगजेबाच्या वावटळीत १७०१ मध्ये तो मुघलांकडे गेला. यातून त्याची सुटका केली ती छत्रपती शाहूंनी. मराठ्यांकडील हा वारसा अखेर एप्रिल १८१८ मध्ये मेजर थॅचरने हिसकावून घेतला.
.
उत्तरेकडील मांढरदेवीची डोंगररांग आणि तिच्यावर चमचमते देवस्थान दिसते. पूर्वेला खंबाटकी घाटाचा डोंगर,त्यापलीकडे नांदगिरी, चंदन-वंदन, वैराटगड रामराम करतात.दक्षिण अंगाला पाचगणी, महाबळेश्वरचे पठार त्याला जोडूनच पश्चिम अंगाला कमळगड आणि त्याअलीकडचा केंजळगड. या साऱ्यांच्या मधोमध चमचमते पात्र घेऊन संथ वाहणारी कृष्णा येते. तिच्या काठावरची ती धोम, मेणवली आणि प्राचीन वाईनगरी… आणि जणू या साऱ्या देखाव्यावर लक्ष ठेऊन असलेला हा पांडवगड.
.
#सातारा #वाई #पांडवगड #कृष्णानदी #धोम #कमळगड #केंजळगड #वैराटगड #महाबळेश्वर #पाचगणी #रायरेश्वर #satara #wai #pandavgad #dhomdam #kamalagad #kenjalgad #maharashtratourism #mahabaleshwar #oachgani #raireshwar #nagartrekkers #fortsofmaharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке