भाग ९ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन |BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

Описание к видео भाग ९ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन |BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता 🙏🙏
GOOGLE PAY : 7038205363

You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363

४१.
डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ॥
तुझीया चरणी वाहे भीमा चंद्रभागा ,
कसा येऊ सांग देवा झालो मी अभागा ,
आता तरी एक वेळा देवा मला पाव रे ॥
तुझ पाहण्यासी माझा जीव भूकेला,
धीर ना वाटे देवा माझीया मनाला ,
येऊ मी कोण्या रिती दूर तुझे गाव रे ॥
गोर्या कुंभाराची देवा ऐकली विनवनी,
भक्त एक़नाथा घरी वाहीलेसे पाणी,
मजकान मिळे देवा तुझ्या पायी ठाव रे ॥
प्रल्हादा कारणे कैसा नरसिंह झाला ,
भक्त तारण्याशी प्रभू दृष्ट मारियला,
म्हणे दास तुकड्या मजला रुप तुझे दाव रे ॥

४२.
उघडा हे दार आम्ही आलो पाया ।
नका पंढरिराया ! दूर लोटू ||
बाहेरील श्वान ओरडती जोरे ।
चावतील वारे ! अंगालागी ||है
अंधारिया रात्री दुजा कोणी नाही ।
मारिता हाकही कोण ऐकी ? ||
तुकड्यादास म्हणे मज घ्याहो आंत ।
घरूनिया हात ओढा तुम्ही ||

४३.
आवडला मज सखा पंढरीराया ।
चित्त तयाविन शांत नोव्हे ॥धृ॥
तयाचीच लेणे लाविन या देहे ।
काढिल या संदेहा घरातुनी ॥
हाती टाळ खांदी पताकांचा भार ।
नामाचा उच्चार मुखवाटे ॥
तुकड्यादास म्हणे मन मोहविले ।
आपुलेसे केले पंढरीराये ॥

४४.
दान हेचि मागो सख्या पंढरीराया ।
नामाविन वाया न गमो क्षण ॥
काया वाचा मने, घडो जनसेवा ।
लागो जीवभाव भक्ति तुझी ॥
जागृती वा स्वप्नी, न तुटे ध्यास ।
तयाविन आस, न उरो मज ॥
तुकड्यादास म्हणे, गोड हा शेवट ।
वृत्ती राहो नीत, तुझ्या स्वरुपी ॥

४५.
कीर्तनाच्या रंगी हरी रगला ।
भोळ्या भाविकासी छंद लागला ! ।।
युक्तिवादी, बुध्दिवादी पाहती डोकावुनी ।
त्यांना वाटे वेड्यांचा बाजार जाहला झणी ।।
देहभान हे विसरुनी त्यांनी, स्वाभिमान सोडला ।।
यमराजाच्या दरबारी जंव,स्वाभिमानी पोहोचती ।
अहंकार घेउनी शिरावरी, घट्ट उभे राहती ।।
केल्या दुष्कर्माच्या बदली, जाती भोगावया ।।
नम्र सदा देवाच्या पायी, काम - क्रोध सोडुनी ।
तोचि आवडे प्रभुरायाला, नाचे हरी कीर्तनी ।।
सत्‌कर्माचे, सत्‌धर्माचे, त्यासी म्हणे आपुला ।।
युक्ति-बुध्दी-भक्ति यांची सांगड जे घालती ।
वैराग्याच्या तपोबलाने प्रेमा संपादिती ।।
तुकड्यादास म्हणे कनका जणु सुगंध हा लागला ।।

Комментарии

Информация по комментариям в разработке