भाग ६ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

Описание к видео भाग ६ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता
GOOGLE PAY : 7038205363

You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363

२६.
कधि येशिल मनमोहना ! पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
ती मधुर तुझी बांसरी, ऐकु दे एकदा तरी ।
करी प्रसन्न अमूच्या मना,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जाहले ।
तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
ऐश्वर्य तुझ्या वेळिचे, गोपाळ - गोपी - मेळिचे ।
नच स्वप्नि दिसे त्या खुणा,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
तुकड्याचि आस कर पुरी, तू गरुड सावरी हरी ।
घे धाव नंद - नंदना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।

२७.
प्रभु रुसला, ऐसे म्हणता का ? आपणची दोषी नाही का ? ।।धृ।।
हरिने गीता बोध दिला जो, एकापुरता का होता तो ?
भारतवासी म्हणुनि बोलला । हे अजुनी कळले नाही का ? ।।
तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे, विसरुनिया अंतरिचे काळे ।
गोपाळांनो ! या गोपिंनो, हा तुमचा निश्चय आहे का ?।।
प्रभु रुसला ! ऐसे बोलावे । मनमाने ती पाप करावे ।
केले तैसे कुणी भरावे ? तुकड्यादास म्हणे, आम्ही का ? ।।

२८.
प्रभु ! सांग तुझ्यामधे काय असे ?
माझे मन तुज पाहण्यासी लालसे ।।
कितितरि भक्तांनी तुजसाठी, अपुले प्राण दिले रे ।
त्यागुनि धन-दौलत-संसारा, तुजला वश केले रे ! ।
मज कळतचि नाही वेड कसे ! ।।
काय करावे यासाठी बघ, सांग जरातरि काही ?
ज्यांना-ज्यांना जाई विचारी -कोणिहि सांगत नाही ! ।
म्हणुनिच रडतो मी साहसे ! ।।
मज गमते तू सागर जैसा, प्रेमाचा भरलासे ! !
म्हणुनिच तुजला ध्याती सगळे- जीवे शिवे उल्हासे ! !
तुकड्या म्हणे, आता वेळ नसे ! ।।

२९.
मंगलमय नाम तुझे, सतत गाऊ दे॥
दुर्बल या हृदयातुनि, चंचल या चित्तातुनि।
झुरझुरत्या नेत्रातुनि, स्वरुप पाहु दे।।
अंधाऱ्या, निर्जन वनि, विषयांच्या काट्यांतुनि।
चौऱ्यांशी गोट्यातुनि, पार जाउ दे ।।
संतांची बोध-धुळी, लागो या देह-कुळी।
भक्तीच्या प्रेम-जळी, मस्त होउ दे। मंगल ०।।
मन्मानस-मंदिरात, सिंहासन तव प्रशांत
सोSहं ध्वनि गात गात, रंगि रंगु दे ।।
भवसागर कठिण घोर, षडरीपु हे करिति जोर।
तुकड्याची नाव पार, स्थीर होउ दे ।।

३०.
तेरे सहारे सुधर॒ जायेंगे हम ।
यह माया की नदियाँ गुजर जायेंगे हम ।।
चारो तरफ मोह मदका अंधेरा ।
जीवनकी किस्तीमें धोखेका डेरा ।
तेरे नाम रोशनसे तर जायेंगे हम ।।
जो तुझको भूले वे मारे फिरेंगे,
अपना भला ना करेंगे ।
हम तो तेरे नामकी तारी बनके,
जो कुछ भी करना है, कर जायेंगे हम ।।
है कौन दुनियामें तुझसे भी प्यारा?
देखा फिरा मैने संसार सारा ।
तुकड्या कहे डर बिसर जायेंगे हम ।।

Комментарии

Информация по комментариям в разработке