Pradnya Satav यांना Vidhan Parishad निवडणुकीत धोका ? यंदाही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो ?

Описание к видео Pradnya Satav यांना Vidhan Parishad निवडणुकीत धोका ? यंदाही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो ?

#BolBhidu #VidhanParishadElection #MaharashtraCongress

महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने आता निवडणूक होणार आहे हे नक्की झालं आहे. ५ जुलैरोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पण, कोणीही अर्ज मागे घेतला नसल्याने १२ जुलै रोजी आता मतदान पार पडणार आहे. विजयासाठी मतांचा कोटा २३ चा आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष या मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट सवर्च पक्षांना उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज आहे.

पण, ज्या पक्षाला मतांची गरज नाही तो पक्ष आहे काँग्रेस. काँग्रेसने विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांच्या रूपाने एकमेव उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे कोटा पेक्षा अधिकची १० ते १२ मतं आहे. आणि याच मतांवर इतर सर्वच पक्षांचा डोळा असणार आहे. त्यामुळे मुंबईत सध्या घोडेबाजार चांगलाचं तेजीत असल्याचं बोललं जातंय. पण, काँग्रेसकडे अधिकची मतं आहेत म्हणजे त्यांचा उमेदवार सेफ आहे का? आणि नसेल तर का नाहीये? २०२२ च्या विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेसकडे मतांचा कोटा असतांना देखील काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे कशा प्रकारे पराभूत झाले होते? पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке