Traditional Khalu Baja With Professional Dance !! Rupesh and Sandesh 9769847299 !! 9819011966

Описание к видео Traditional Khalu Baja With Professional Dance !! Rupesh and Sandesh 9769847299 !! 9819011966

.........कोकणची पारंपारीक कला...........

(दिनांक 16 जुलै 2022 रोजी सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर मुलाखतीच्या निमित्ताने आपल्या त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथकाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याची मिळालेली उत्तम संधी.)
(ही मुलाखत Rupesh Murudkar या नावाने you tube वर पाहु शकता.)

खालु बाजा हे कोकणातील पारंपारीक आणि लोकप्रिय वाद्य आहे.कोकणात या वाद्याला प्रचंड मान आहे.या वाद्यात सनई, ढोल, टिमकी हे वाद्य प्रामुख्याने वाजवले जातात.आगरी कोळी बांधव याला टिमकीचा बाजा या नावाने ओळखतात. लग्न, मुंज, दहीहंडी, गणपती उत्सव अशा अनेक शुभ कार्याकरीता हे वाद्य वाजवले जाते.
मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात लोप पावलेली ही पारंपारीक कला दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र श्री. संदेश हरिश्चंद्र मुरुडकर आणि
श्री. रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर या दोन बंधूंनी सन २००० साली त्रिमुर्ती संदेश खालु बाजा या नावाने मुंबईत अंधेरी येथील वर्सोवा कोळीवाडा येथून चालु केली.
डीजे, पुणेरी ढोल, बँजो नाशिक बाजा असे अनेक वाद्य असताना आपली ही कला मुंबईत टिकेल का ? हा मोठा प्रश्न उभा राहिला परंतु या दोन बंधूंनी अगदी जिद्दीने आ उत्तणि चिकाटीने ही पारंपारीक कला टिकवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. खालु बाजासोबत नृत्य ही वेगळीच कल्पना त्यांनी आपल्या कलेतून सादर करुन माय बाप रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मुंबईतील गोविंदा पथके, कोळीवाडे, अनेक नामांकित फेस्टिवल, राजकीय नेत्यांच्या मिरवणूक, अल्बम्स, वृत्तपत्र,तसेच टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून या पथकाची प्रसिद्धी होत गेली.सुरत, रायगड, रत्नागिरी, जळगांव, पुणे अशा अनेक ठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळाली.गेली २२ वर्ष हे कलाकार मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपली कला सादर करीत आहेत.
आगरी - कोळी बांधवांचा आवडता हा टिमकी बाजा या कलाकारांच्या माध्यमातून मुंबईत पहायला मिळत आहे.
साता समुद्रापार आपली कला पोहचावी हे स्वप्न उराशी बाळगून हे कलाकार जिद्दीने आपली पारंपारीक कला जोपासत आहेत.

संदेश हरिश्चंद्र मुरुडकर - 9819011966

रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर - 9769847299

Комментарии

Информация по комментариям в разработке