राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | भाग ५ | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

Описание к видео राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | भाग ५ | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता , या चॅनल वर ads बंद आहे 🙏🙏
GOOGLE PAY : 7038205363

You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363

२१.
उठा गड्या ! अरुणोदय झाला, श्री सद्गुरुच्या ज्ञानाचा ।
सोडा काम-विकार-बिछाना, नाश करा अज्ञानाचा ।।
बघा अंबरी पक्षि बरळती, विवेक - बोधाची दाटी ।
वैराग्याची लाली निघाली, आर्तांच्या जिवनाकाठी ।।
भक्ति-फुवारे झुळझुळ उडती, प्रेमाच्या वायू-किरणी ।
साक्षिराज तो अलख जागवी, हाक देइ दारावरुनी ।।
क्षमा-शांति अजि ! दया-गोधने, वृत्ति-वत्स घेउनि निघती ।
अनुभव-शिखरी जाति चराया, अगमनिगम-चारा बघती ।।
श्रध्देचा दरवाजा उघडा, या श्रृतिस्मृतिचे वैराणी ।
तुकड्यादास म्हणे जागृत व्हा,नका करु ही वेळ उणी ।।

२२.
सतसंग जरी क्षण एक मिळे, जिव पावन होइल हा अमुचा ।
कधि भाग्य घडे असले सहसा, उपदेश फळे हृदया तुमचा ।।
आम्हि चातक तव निजस्वरुपाचे, जे कळताची अज्ञान हरे ।
मी ब्रह्म असे निजतत्व पटे, जव अनुभव ये उपदेशाचा ।।
हे विश्व आम्ही नटलो मिळुनी, जरि एकचि मुळचे ब्रह्म असू ।
तुकड्या म्हणे खेळ कळेल जया, तो धन्य म्हणावा सद्गुरुचा ।।

२३.
झूठों के संगत मे जाना नहीं ।
नाहक कि आफत उठाना नहीं ॥
कौन कहेंगा किस दिन धोका ।
होगा घर के घर में ।
निंदा किसीकी ही ना बोलो ।
बात चले पलभर में ।
बातों का इनसे ठीकाना नहीं ॥
अच्छे भी होते है पागल ।
झूठों की संगत से ।
गुंडे दंडे वाले रहते ।
हरदम हि पंगत से ।
कहके भी इनको बताना नहीं ॥
दूर हि से वंदन दुर्जन को ।
समज उमज कर करना ।
तुकड्या दास कहे मुँह फेरो ।
अपनी राह सुधरना ।
इनसे तो निपटोल जाना नहीं ॥

२४.
येउ दे दया आता तरी गुरुमाउली ।
या आयुष्याची दोरी कमी जाहली ।।
लागला श्वास-खरखरा । जीव होतो हा धाबरा ।
वासना तुझ्या दर्शनातची राहिली ।।
हा जन्म तुला अर्पिला । हे नको सांगणे तुला ।
तू साक्षि जगाची, कीर्ति तुझी ऐकिली ।।
बस सेवा दे आखरी । तवा नाम जपे वैखरी ।
तुकड्या म्हणे चिंता-चिता तुला वाहिली ।।

२५.
समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली ।
लाभो जनास सकळा, किती गोड ही प्रणाली ।।
रांगेत बैसवोनी, अति शांतता करोनी ।
गंभीर गाति सारे, किती गोड ही प्रणाली ।।
सर्वास वस्त्र खादी, डोक्यात टोपी भगवी ।
नमताति सर्व मिळुनी, किती गोड ही प्रणाली ।।
सर्वांस वाव येथे, कुणि उचं नीचं नाही ।
अणि पंथ भेद नाही, किती गोड ही प्रणाली ।।
वेळेवरीच यावे, अति संघटोनी जावे ।
तत्वास या बघावे, किती गोड ही प्रणाली ।।
जगतात वाद जे जे, मिटवोनी सर्वही ते ।
माणूसकीस दावी, किति गोड ही प्रणाली ।।
दु:खी कुणी नसावा, पापी कुणी नसावा ।
तुकड्या म्हणे सुखाची,किति गोड ही प्रणाली ।।

Комментарии

Информация по комментариям в разработке