Rashtrasant Tukdoji Maharaj - मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव ।। रचना -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Описание к видео Rashtrasant Tukdoji Maharaj - मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव ।। रचना -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव ।
देव अशान, भेटायचा नाही रे ।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ॥धृ॥
दगडाचा देव, त्याला वडराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चांदीचा देव, त्याला चोराचं भेव ॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात ॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी?
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ॥४॥
रचना -राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज
Rashtrasant Tukdoji Maharaj –Mani Nahi Bhav
Source: From the collection of Shri. Mohan Gaigol, Rashtrasant Tukdoji Maharaj Gurudev Seva Ashram Bhajan Mandal, Changefal. हे भजन share करण्यामागे फक्त महाराजांच्या ठायी असलेली भावभक्ती हा एकमेव हेतू आहे.
Subscribe to this channel and stay tuned:    / @manikdhore6821  

Комментарии

Информация по комментариям в разработке