Gauri Gosavi जन्मशताब्दी वर्षानिमित्त "सद्गुरु श्री वामनराव पै" यांना गौरी गोसावीची गीतातून मानवंदना

Описание к видео Gauri Gosavi जन्मशताब्दी वर्षानिमित्त "सद्गुरु श्री वामनराव पै" यांना गौरी गोसावीची गीतातून मानवंदना

गीत : स्मरण करू हो स्मरण करू गुरुरायांचे स्मरण करू
गीतकार : श्री प्रवीण दवणे
संगीतकार : श्री दीपक पाटेकर
गायिका : कुमारी गौरी गोसावी
संवादिनी : श्री रवींद्र पंडित
तबला : श्री यजुवेंद्र बांदकर
मृदुंग : हर्षद मेस्त्री
टाळ : मंदार पांचाळ

स्मरण करू हो स्मरण करू | गुरुरायांचे स्मरण करू |
करुनी नेटका प्रपंच सुंदर, परमार्थाची कास धरू |
जीवन विद्या जाणून घेऊन, सुख शांतीचा कलश भरू || धृ ||
सगुण रूपातून ईश्वरा दिसला, सद्गुरूंच्या या ठाई |
स्वरूपाचा मज वेध लागला, सद्गुरूंच्या या पायी |
गुरु ज्ञानाच्या नावेतून या, भवगंगा ही पार करू |
स्मरण करू हो स्मरण करू, गुरुरायांचे स्मरण करू || १ ||
प्रपंच करूनी नेकपणाने, मुक्ती साधा आपुली |
संतती, संपत्ती, संगती, ईश्वर, आरोग्य अमृत बोली |
पंचशील हे सुखी जीवनाचे या, जीवनाची कास धरू |
स्मरण करू हो स्मरण करू, गुरुरायांचे स्मरण करू || २ ||
हवेचआम्हाआत्मज्ञान हे, झेप ही विज्ञानाची |
दोन पंख हे या राष्ट्राचे, साथ हवी जिद्दीची |
अखिल जगातून संस्कृती ध्वज हा, अभिमानाने उंच धरू |
स्मरण करू हो स्मरण करू, गुरुरायांचे स्मरण करू || ३ ||

Комментарии

Информация по комментариям в разработке