निसर्गरम्य उंबरशेत गाव आणि बटावले काकांचा स्तुत्य उपक्रम 😍 | Umbarshet - दापोली, रत्नागिरी (Konkan)

Описание к видео निसर्गरम्य उंबरशेत गाव आणि बटावले काकांचा स्तुत्य उपक्रम 😍 | Umbarshet - दापोली, रत्नागिरी (Konkan)

निसर्गरम्य उंबरशेत गाव आणि बटावले काकांचा स्तुत्य उपक्रम 😍 | Umbarshet - दापोली, रत्नागिरी (Konkan) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात डोंगरावर अतिशय निसर्गरम्य असे उंबरशेत गाव वसलेले आहे. केळशी येथून या गावी जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. आंबवली गावाच्या बस थांब्याजवळून सुद्धा या गावात रानातून पायवाटेने जाता येते. केळशी गावातून या गावी जाण्यासाठी रिक्षा मिळतात. 100-150 रुपयात या गावी पोहोचता येते. कोकणातील सर्वच गावे पाहण्यासारखी आहेत. प्रत्येक गावात विशेष असं काहीतर असतंच. उंबरशेत या गावांमध्ये येण्यासाठी आम्हाला बटावले काकांनी निमंत्रित केलं होतं. आम्ही संपूर्ण उंबरशेत गाव फिरलो. निसर्ग चक्रीवादळात या गावाचे सुद्धा नुकसान झाले परंतु काकांनी गावातील नवतरुणानं एकत्र घेऊन रुक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम राबविला आणि बरीच झाडे आपल्या गावाच्या वेशीवर डोंगरावर लावली. #UmbarshetDapoli #MazaKokanchaGav #KonkanVillage #sforsatish
या गावची ग्रामदेवता काळेश्वरी, कालभैरव, धरणकरीन असून हे देवस्थान जागृत आहे. दुरदुरुन भाविक येथे येत असतात. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन नुकतेच देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धार केले आहे. काही काम अजून चालू आहे ते लवकरच पूर्ण होईल. गावामध्ये जवळपास 150 घरे आहेत. कोकणी पद्धतीची पारंपरिक घरे या उंबरशेत गावात पाहायला मिळतात. आजकाल ही घरे सुद्धा लोप पावत चालली आहेत. पक्की, पत्र्याचे छप्पर असणारी घरे आजकाल कोकणात बांधली जात आहेत. या गावातील सर्व मंडळींना भेटून आम्हाला अतिशय खूप आनंद झाला. आमचा अतिशय मायेने, प्रेमाने पाहुणचार केला गेला. बटावले काका त्यांचे पुत्र, रोडत साहेब, सर्व नवतरुण मंडळी यांचे खूप खूप आभार! तुम्ही जेव्हा कधी केळशी, दापोली फिरण्यासाठी याल तेव्हा उंबरशेत गावाला नक्की भेट द्या! तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका!

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке