चंदन शेतीची संपूर्ण माहिती | चंदन शेती | Chandan Sheti | Sandalwood Farming

Описание к видео चंदन शेतीची संपूर्ण माहिती | चंदन शेती | Chandan Sheti | Sandalwood Farming

चंदन शेतीची संपूर्ण माहिती | चंदन शेती | Chandan Sheti | Sandalwood Farming #sandalwood #krushiday

चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम गाळाची, काळी माती व नदी-नाल्याच्या काठच्या जमिनीत याची चांगली वाढ होते.

चंदनाचे झाड काहीअंशी परोपजीवी असल्याने त्याची वाढ होण्याकरिता सहयोगी वृक्षाची आवश्‍यकता असते. नैसर्गिक जंगलात चंदनाची वाढ शिरस, धावडा, बाभूळ, गिरिपुष्प, टेटू, बोर, सिसू, कडुलिंब, करंज इत्यादी वृक्षांच्या समूहात होते.
रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करावी. चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या झाडामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी. जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आधार मिळेल. यासाठी सुरू, मॅजियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया यांची निवड करावी.
सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते.
व्यावसायिक काढणीचा काळ १५ वर्षांचा असतो. चंदनाची प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करावी. लागवडीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Комментарии

Информация по комментариям в разработке