किल्ले मोरगिरी (Morgiri fort) लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला किल्ला..

Описание к видео किल्ले मोरगिरी (Morgiri fort) लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला किल्ला..

पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात “मोरगिरी” नावाचा एक अपरिचित किल्ला आहे. किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहता, हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा. मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने एका ठिकाणी लोखंडी शिडी व दोन ठिकाणी अवघड कातळ टप्प्यांवर सुरक्षेसाठी रोप लावलेला आहे. जांभुळणे (Jambhulne village) हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव. गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. किल्ल्याची उंची (Height of the Morgiri Fort) 3010 फूट एवढी असून शेवटच्या टप्प्यातील अवघड चढणामुळे ह्या किल्ल्याची ट्रेक श्रेणी मध्यम ते अवघड समजली जाते. गडावरून दक्षिणेकडे पाहिले असता कोरीगड किल्ला (Korigad Fort) दिसतो तर पूर्वेला जवळच तुंग किल्ला (Tung Fort) आहे. तुंग किल्ल्याचे मागे पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय (Backwaters of Pavna Dam) दिसतो. त्यामागे पूर्वेला तिकोना किल्ला (Tikona Fort) तर थोडं उत्तरेकडे पाहत गेल्यावर लोहगड आणि विसापूर किल्ला (Lohgad and Visapur Fort) दिसतो.
.
.
Follow on Instagram: https://www.instagram.com/sandy_shind...

Комментарии

Информация по комментариям в разработке