कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1

Описание к видео कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1

कोकणातील रहस्यमय गाव- तळेवाडी,श्रावण । रहस्यमय - तळे,प्रथा,गुहा,दगडांचे स्तंभ, । Episode-1। भाग- 1

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावण गाव आणि या गावाला आहे एक छोटीशी तळेवाडी...गावापासून जेमतेम २ कि.मी. वर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत. या वाडीत क्षेत्रापाल देवतेचे मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी आहे. देवळात जायला शेतातून वाट... तळेवाडीत संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात. श्रीक्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेले चालत नाही. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी. अगदीच असह्य झाले तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचे. तसेच इथे कुठल्याही प्राण्याचे रक्त सांडलेले क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मास मटण करत नाहीत. जे करायचे ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचे. इथे पशु-पक्ष्यांचा मोठा वावर असतो, पण क्षेत्रपालाची जरब एवढी की त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी माणसानेही त्यांना त्रास द्यायचा नाही. अजून एक निसर्गचमत्कार इथे बघायला मिळतो. श्रीक्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठे तळे आहे. देवाचेच तळे हे...कितीही महामूर पाऊस झाला तरी ते भरत नाही. मात्र जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसे तळ्याचे पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागते. इतके वाहते की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात. परत पावसाळा येऊ लागला की हे पाणी कमी होत जाते. सगळेच खरेतर विपरीत. पण हीच तर कोकणाची खासियत आहे.त्याच वाडीच्या सड्यावर आहे वाघबाव म्हणजेच एक गुहा.. आणि तिकडेच पुढे एक गणपती च मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला त्या मंदिर समोर खूप सारे दगडांनी बांधलेले दीपस्तंभ पाहायला मिळतात.. गुर राखणारे जुने लोक तिकडे ते दीपस्तंभ बनवून देवाकडे नवस मागायचे.. गणपती आणि गौरी यांची पाषाणी मूर्ती आहे.. ह्या दोन्ही मूर्ती बद्धल मी वलोग मध्ये सांगितलं आहे.. गुहा आणि खालची तळी ही पांडवांनी बांधली आहे ती पण एका रात्री अस तिकडचे लोक सांगत... वलोग नक्की पहा .. कसा वाटला नक्की सांगा.. share करा आणि like करायला विसरू नका..
Location - Shri Kshetraphal Mandir
Talewadi, Shrawan, Taluk Malvan, Dist, Shrawan, Maharashtra 416616
https://maps.app.goo.gl/QhH4GUmZqasZK...

My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1


follow us -

Instagram
  / sanchitthakurvlogs__  
Facebook -   / sanchit.thakur1  
Twitter -
https://twitter.com/SanchitthakurVL?s=09
#mysteriousvillage #konkan

Комментарии

Информация по комментариям в разработке