मी हत्तींशी बोलतो ! | Anand Shinde | स्वयं मुंबई २०१७

Описание к видео मी हत्तींशी बोलतो ! | Anand Shinde | स्वयं मुंबई २०१७

छायाचित्रकार म्हणून यशस्वी करियर सुरु असताना एका वळणावर आनंद यांना हत्तींविषयी कुतूहल जागृत झाले. हत्तींसोबत राहून त्यांनी हत्तींचा बारकाईने अभ्यास सुरु केला. इतकंच नाही, तर त्यांनी हत्तींशी 'संवाद' साधण्यास सुरुवात केली. आज सुमारे पन्नास हत्ती आनंद यांचे 'मित्र' झाले आहेत.

हत्तींविषयी संशोधन करण्यासाठी आनंद यांनी 'ट्रंक कॉल' या संस्थेची स्थापना केली आहे. हत्तीशी असलेले भावबंध उलगडून सांगताहेत आनंद शिंदे !

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

#Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии

Информация по комментариям в разработке