Role of a teacher in Society | Yajurvendra Mahajan, fouder of Manobal (Jalgaon)

Описание к видео Role of a teacher in Society | Yajurvendra Mahajan, fouder of Manobal (Jalgaon)

मनानं खचलेल्या आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून, समजून घेऊन त्यांच्यावर उत्तम शिक्षणाचे संस्कार करून त्यांना समाजात खंबीरवणे उभं राहण्यासाठी ग्रामीण भागात स्थायिक झालेला यजुर्वेंद्र महाजन हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ! शिक्षणाचं उद्दिष्टच गोंधळाचं आहे आणि ते आधी सुनिश्चित करून त्याप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी असं ठामपणे सांगत अनाथ, अपंग मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या यजुर्वेंद्र महाजनचा हा व्हिडियो अवश्य बघावा असाच !

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

#Marathiinspiration #disability #jalgaon

Комментарии

Информация по комментариям в разработке