रंगपंढरी Face-to-Face: Vandana Gupte - Part 1

Описание к видео रंगपंढरी Face-to-Face: Vandana Gupte - Part 1

Classes आणि Masses ह्या दोघांच्याही पसंतीस उतरणारे कलाकार मोजकेच असतात. आपल्या अष्टपैलू कलागुणांमुळे ह्या दोन्ही गटांची वाहवा मिळवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते.

गेली ५० वर्षे मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या वंदना ताईंनी आजवर ६० नाटकांतून भूमिका साकारल्या आहेत. 'रमले मी', 'अखेरचा सवाल', 'झुंज', 'सुंदर मी होणार', 'चारचौघी', 'अभिनेत्री', 'श्री तशी सौ', 'शूss, कुठे बोलायचं नाही', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'रंग उमलत्या मनाचे', 'वाडा चिरेबंदी', 'मन उधाण वाऱ्याचे', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' ह्या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

आई (प्रख्यात गायिका माणिक वर्मा) ह्यांच्याकडून वारशाने मिळालेलं स्वरांचं ज्ञान, उपजत विनोदबुद्धी, बिनधास्तपणा, ऊर्जा आणि अभ्यासू, मेहनती स्वभाव ह्या सगळ्याचा वापर करत वंदना ताईंनी प्रत्येक भूमिकेचं कसं सोनं केलं ते ऐकूया आजच्या भागात.

Комментарии

Информация по комментариям в разработке