वीर धारेराव मंदिर, कुमशेतचा कोकण कडा, आणि घोडीशेप चा डोंगर/Dharerao Temple/Ghodishep/Kumshet, Akole.

Описание к видео वीर धारेराव मंदिर, कुमशेतचा कोकण कडा, आणि घोडीशेप चा डोंगर/Dharerao Temple/Ghodishep/Kumshet, Akole.

सह्याद्रीच्या कुशीतील वीर धारेराव मंदिर. राजूर पासून तीस किलोमीटर अंतरावरील कुमशेत हे एक आदिवासी खेडे आहे .एखादे लहान मूल जसे आईच्या कमरेवर शोभते तसेच हे कुमशेत गाव कोकणकड्याच्या कमरेवर बसलेले आहे.निसर्गाची मुक्त हस्ते उधळण अत्यंत दाट वृक्षसंपदेणे नटलेला हा परिसर आहे. बिबटे वाघ, साळींदर, कोल्हे, लांडगे नीलगाय, भेकर , सांबर, शेकरू असे विविध प्राणी या जंगलांमध्ये आढळतात. तिकडे शहरात 40 डिग्री टेंपरेचर असताना तिथे मात्र 28 डिग्री टेंपरेचर होते म्हणजे किती थंड ठिकाण आहे .कुमशेतच्या कोकण कड्यावरून पूर्ण माळशेज व्हॅली दृष्टीक्षेपात येते दूरवर नजर टाकली असता सिंदोळा ,उधळा, माळशेज चा बोगदा ,भगेरिया ,वऱ्हाडी डोंगर, नाणेघाट, मोरोशीचा भैरवगड, जीवधन ,ढाकोबा चे शिखर दर्शन देते ,डाव्या बाजूस घोडीशेपचा डोंगर ,बीनी आई ,तसेच देमाई कोपि, नापत्याची जोडगोळी, त्याच्या बाजूलाच हरिश्चंद्रगडाचा पहाड ,रोहिदास, फ़नट्या आणि शिंग्रोबा चे शिखर,तसेच कोकणामध्ये दादर डोंगर दिसतो .उत्तरेस कुमशेत चा खुंटा म्हणजेच कोंबडा डोंगर, त्याच्या बाजूलाच गवळदेव ,कात्राबाई ,आजोबा पर्वत इत्यादी दुर्ग शृंखला दिसते. थोडे पुढे गेले असता पाथरज घाटाची वाट दिसते . अत्यंत कठीण घसार्‍याची ही वाट आहे . ही घाटवाट पुढे खाली कोकणातल्या कुंडवाडी या गावाजवळ मिळते . तिथून आपण आजोबा पर्वत ला जाऊ शकतो.

वीर धारेराव मंदिर - अकोले तालुका तसा डोंगराळ आदिवासी आणि दुर्गम आहे .या तालुक्यातील कुमशेत या गावी विर धारेराव यांचा एका गरीब आदिवासी कुटुंबामध्ये जन्म झाला. त्याकाळी अठराव्या शतकामध्ये इंग्रजांचा अंमल या परिसरात होता, तसेच सावकारशाही देखील उग्ररूप धारण करत होती या सर्वांविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून वीर धारेराव याने एक इतिहास रचला.गोरगरीब आदिवासींना लुटणाऱ्या टोलधाडी विरुद्ध धारेराव ने शस्त्र उचलले.आदिवासी कुटुंबांना मदत करू लागला. मुळा नदीच्या प्रवाहाच्या शेजारीच जन्म झाला म्हणून त्याचे नाव धारेराव तसेच त्याच्या पाठचा भाऊ असलेल्या बाळाचा जन्म आजोबा पर्वतावरील वाल्मिकी ऋषी च्या आशीर्वादाने व नवसाने झाला आणि प्रचिती आली म्हणून त्याचे नाव परिचित राव असे ठेवण्यात आले. परिचित रावाची समाधी आजही सादडे घाटामध्ये आपणास पहावयास मिळते. एके दिवशी वीर धारेराव कुंडवाडी वरून घाट चढून वर जात आहे असे खबर इंग्रजी अधिकाऱ्यांना लागली व इंग्रजांनी कुमशेत जवळ घोडीशेप डोंगराच्या जवळ असणाऱ्या पाथरज घाटाजवळ सापळा लावला आणि टप्प्यात येताच वीर धारेराव यास गोळ्या घालून ठार मारले. त्यांचे मंदिर आजही आपणास तुमच्याजवळ पाहायला मिळते

Комментарии

Информация по комментариям в разработке