Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse नंतर BJP High command महाराष्ट्रात नेतृत्व बदल करणार का?

Описание к видео Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse नंतर BJP High command महाराष्ट्रात नेतृत्व बदल करणार का?

#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharajStatue #DevendraFadnavis

काल मालवणच्या राजकोट येथे राणे आणि ठाकरे असा पारंपारिक सामना रंगला. निमित्त ठरलं ते छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेचं. झालं अस की ज्या ठिकाणी पुतळा कोसळला त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे, नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश राणे एकाच वेळी पोहचले. एकमेकांसमोर आलेल्या या गटांमध्ये वाद वाढला, प्रसंगी धक्काबुक्की झाली. आणि कालच महाराष्ट्रातील दोन वर्तमानपत्रात दोन वेगवेगळ्या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. एक बातमी होती लोकसत्ता मधील. पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात खुद्द नरेंद्र मोदी सहभागी असल्याने एकप्रकारे मोदींच्या दिशेने बोट दाखवण्याची कृती करण्यात आल्याचं देखील बोललं जावू लागलं.

तर दूसरी बातमी दिव्य मराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती. यामध्ये संघामार्फत राज्यात नेतृत्वबदल करावा यासाठी जोर दिला जात असून संघातर्फे गडकरींकडे ही जबाबदारी देण्यात यावी अशी सुचना भाजपला करण्यात आल्याचं सांगण्यात आलय. आत्ता या दोन्ही बातम्या एकाच दिशेने बोट करणाऱ्या होत्या आणि ते म्हणजे भाजप नेतृत्वबदल करण्याच्या तयारीला लागलय. पण खरच या बातम्यांमध्ये काही तथ्य दिसतय का? भाजप हायकमांड नेतृत्वबदलाच्या तयारीला लागलय का? छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यामुळे डॅमेज होणारी भाजप नेतृत्वबदल करून मार्ग काढतेय का? समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке