संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)

Описание к видео संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)

संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan) माझ्या मावस भावाच्या संजयच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. मंडणगड तालुक्यातील जावळे गावात माझ्या मावशीचे गाव आहे. जावळे गावाजवळच माझे आंबवली हे गाव आहे. माझी मोठी बहीण हिला सुद्धा जावळे गावातच दिले आहे. मी खास करून संजयच्या लग्नाला कोकणातील माझ्या गावी गेलो होतो. माझी बायको वर्षा आणि मी लग्नासाठी गेलो परंतु एक अडचण अशी होती की, आमच्या नात्यामध्ये दोन लग्ने होती. एक लग्न माझ्या सासरोडी साखरी गावात तर दुसरे लग्न जावळे गावात होते. नवरी मुलगी मंडणगड तालुक्यातील गुडेघर गावची आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने घराच्या समोरील मांडवात लग्न लागतात. गावच्या लग्नामध्ये एक वेगळीच मजा असते. हळदीचा कार्यक्रम, लग्न, वरात, लग्नानंतरही आणि अगोदर बरेच कार्यक्रम हे घरी होत असतात. खास करून सगळे नातेवाईक या निमित्ताने एकत्र जमतात. माझे सगळे मामा, काका, मावश्या आजोळची माणसे एकत्र आले होते. थंडीच्या दिवसात लग्न लागतात त्यांची मजा वेगळीच असते. गावी कोकणात लग्नात जी मजा येते ती कुठेच नाही. घरी लग्न असेल तर त्यासाठी वर्षभर जमवाजमव चालू असते. लग्नाच्या वेळेस घरात आठवडाभर एक उत्साहाचं वातावरण असतं. गावी कोकणात मांडवात होणारी लग्ने ही सर्व ग्रामस्थ, वरिष्ठ मंडळी आणि नातेवाईक यांच्या साक्षीने होतात. #KonkaniMarathiWedding #MarathiWedding #JavaleMandangad #sforsatish
संजयच्या लग्नात आमची नवरा बायकोची चुकामुक झाली कारण आम्ही लग्नात एकत्र नव्हतोच. दोघांना वेगवेगळ्या लग्नाला जावे लागले. साखरी आणि जावळे गुडेघर गावातील लग्नाला आम्ही दोघांनी उपस्थिती दिली. जावळे गावाला मी खास हळदीला अगोदरच गेलो होतो. हळदीला रात्री खूप धमाल होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गुडेघर गावाला आम्ही सगळेजण लग्नाला गेलो. गाडीतून जावळे ते गुडेघर गावापर्यंत प्रवास केला. लग्नातले जेवण म्हणजे एक वेगळीच चव असते. हळदीला सागोती होती. लग्नातल्या जेवणाच्या भाज्या यांची चव निराळीच असते. आम्ही लग्न लावून पुन्हा जवलर गावी आलो तेव्हा प्रदनु आणि बायको वर्षा वरात बघायला आले होते. आमची भेट झाली. प्रदनुला हा सगळा अनुभव नवीन होता. प्रांजूला आम्ही मिस केले. प्रदनु जाम मस्तीखोर झाला आहे. त्यासोबत दिवस कसा जातो कळतच नाही. एकदंर लग्नाचे दोन दिवस मजा आली. सगळ्या नातेवाईकांना भेटता आलं. लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. आम्ही चंदर मामाकडे राहिलो होतो तिने खूप चांगली आमची सोया केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या आंबवली गावी निघालो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावाला कोकणी पद्धतीने लग्न कसे लागते हे दाखवले आहे. लग्नाचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке