गरिबी पैशांची नसते - विचारांची असते ! | Dr Rajendra Bharud - Interview | Swayam Talks

Описание к видео गरिबी पैशांची नसते - विचारांची असते ! | Dr Rajendra Bharud - Interview | Swayam Talks

डॉ राजेंद्र भारूड ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यतील सामोडे ह्या गावात झाला. आईच्या पोटात असतानाच वडिलांचे छत्र हरवले. आई आणि मावशीच्या प्रेमाने ते एका लहानश्या पानाच्या झोपडीत आपल्या भावंडसोबत वाढले. प्रचंड मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर २०१२ साली, एकाच वर्षी वैद्यकीय पदवी आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास होऊन ते IRS झाले. पुढील वर्षी ट्रैनिंगच्या दरम्यान परीक्षा देऊन त्यांना IAS ही पोस्ट मिळाली आणि महाराष्ट्र कॅडर मध्ये ते सेवेसाठी रुजू झाले. डॉ. राजेंद्र भारुड हे सध्या नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. "मी एक स्वप्न पाहिलं" हे डॉ भारुड यांनी लिहिलेलं स्वतःचं जीवनचरित्र आज हजारो युवकांचे दीपस्तंभ म्हणून काम करीत आहे.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

#Marathiinspiration #SwayamTalks

Комментарии

Информация по комментариям в разработке