मानवा का चिंता वाहतो।तुकडोजी महाराज भजन । विश्व स्नेह भजन। तुकड्यादास

Описание к видео मानवा का चिंता वाहतो।तुकडोजी महाराज भजन । विश्व स्नेह भजन। तुकड्यादास

मानवा ! का चिंता वाहतो ?
होणारे ते चुके न केव्हा, प्रभु सगळे पाहतो ! ।।धृ0।।
नर जन्माला आला जेव्हा ?
तू कधि केले होते कामा ? ?
परी तुझ्या पोटाची कळकळ, जन्मताचि वाहतो ! ।।१।।
अजगर पडला पडुनी राही ।
चालतसे मुंगीच्या पायी ! !
अचूक त्याची खळगी भरण्या, जागिच कुणि दाहतो ! ।।२।।
पोपट - मैना मारि भरारी ।
कुठले त्यांना स्थान नोकरी ?
परी चरुनिया, रोजची येती,मन्मनि उत्साहतो ! ।।३।।
म्हणुनि सांगतो स्मर तू हरिला ।
विसरु नको रे सहकार्याला ?
तुकड्यादासा,अनुभव ऐसा,घडि-घडि मज राहतो ! ।।४।।

Комментарии

Информация по комментариям в разработке