Siddharth, Mitali पाठीशी होते म्हणून एवढा मोठा निर्णय घेऊ शकले | Woman Ki Baat With Seema Chandekar

Описание к видео Siddharth, Mitali पाठीशी होते म्हणून एवढा मोठा निर्णय घेऊ शकले | Woman Ki Baat With Seema Chandekar

#Aarpaar #आरपार

'दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंव्हारुढ संबळ शस्त्रे अंबे त्वा लेवुनी हो', म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी देवी सीमोल्लंघन करते असं आपल्याकडे मानलं जातं. देवीने युद्ध करून दानवांवर विजय मिळवला. आजच्या 'वुमन की बात'मध्ये आपण अशाच एका महिलेशी गप्पा मारणार आहोत, जिने चौकटीबद्ध विचारांचं सीमोल्लंघन करून अनेक महिलांसमोर वेगळा आदर्श ठेवलाय. ती नवदुर्गा म्हणजे सीमा चांदेकर!

पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं त्यांचं बालपण! पुढे लग्न-संसार, मुलंबाळं यांची घडी बसवण्यासाठी अनेक छोटे-मोठे व्यवसाय त्यांनी केले. इतरांसाठी जगता जगता स्त्री स्वतःसाठी जगणंच विसरते, नवरा-मुलं यांच्या आवडीतच स्वतःची आवड मानते, पण असं न होऊ देता आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने सावरली!

तो निर्णय होता ५७ व्या वर्षी पुनर्विवाह करण्याचा! हा निर्णय, जवळच्यांची साथ आणि या प्रवासाची संपूर्ण गोष्ट आजच्या भागात आम्ही उलगडलीये. बरंच काही शिकवणारा, एका 'स्त्री'ची कणखर, क्वचित टचकन डोळ्यात पाणी आणणारी हळवी बाजू दाखवणारा आजचा एपिसोड!

"आयुष्य कसं जगायचंय हे तुम्ही ठरवायचं, रडत रडत का गाणं म्हणत" याप्रमाणे सीमाताईंनी गाणं म्हणत स्वतःचा मार्ग स्वतः निवडला. हीच सकारात्मकता कायम सगळ्यांमध्ये रहावी अशीच प्रार्थना विजयादशमीनिमित्त करूया! एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा
शुभ दसरा!

0:00 - परिचय
07:05 - पेठेतलं बालपण
10:09 - बालनाट्य स्पर्धा व किस्से
15:55 - व्यावसायिक नाटकांत काम
19:05 - लग्न, संसार व व्यवसाय
27:05 - मुलींचं हॉस्टेल चालवण्याचा अनुभव
31:12 - सकारात्मक दृष्टिकोन
32:03 - मुलांवर संस्कार
34:10 - वेगळं होण्याचा निर्णय व मुलांचा पाठिंबा
39:35 - दुसरं लग्न करण्याचा निर्णय
45:05 - लग्नाचा निर्णय कसा घेतला
48:55 - ...आणि पार्टनर मिळाला
51:04 - सून मितालीचा पाठिंबा
54:55 - जाऊबाईंचं बोलणं आठवलं
57:55 - समाजाच्या प्रतिक्रिया
01:01:40 - सासू - सुनेचं नातं
01:03:58 - पार्टनरबद्दल थोडक्यात
01:05:40 - वृद्धाश्रमाबद्दलचे विचार
01:08:15 - लग्नसोहळा
01:12:13 - महिलांसाठी सल्ला

Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya

Комментарии

Информация по комментариям в разработке