वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? (भाग दोन)- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech

Описание к видео वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? (भाग दोन)- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सोपा अर्थ असा की, जेवढा पुरावा उपलब्ध असेल तेवढा विश्वास ठेवणे.- डॉ. नरेंद्र दाभोलकर

विज्ञान हे सार्वजनिक असते. वैज्ञानिक सत्य सर्वांसाठी खुले असते. ज्या कोणाला त्याविषयी कुतूहल असते, त्याला ते तपासून घेता येते. वैज्ञानिक दृष्टिकोनाला मताचा अभिनिवेश मंजूर नसतो, कारण मताच्या अभिनिवेशाचे स्वरूप व्यक्तिनिष्ठ असते आणि त्याचा पाया पूर्वग्रह असतो, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. श्रद्धाधिष्ठित मत वैयक्तिक स्वरूपाचे आहे, असेच वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा वस्तुनिष्ठ असतो, व्यक्तिनिष्ठ नसतो. (संदर्भ:तिमिरातुनी तेजाकडे)
-डॉ. नरेंद्र दाभोलकर

Комментарии

Информация по комментариям в разработке