सुप्रियाताई बाकल यांची मुलाखत भाग 2

Описание к видео सुप्रियाताई बाकल यांची मुलाखत भाग 2

यवतमाळला कोणी विलायची, लवंग, मिरे, सफरचंद, पिस्ता, वेगवेगळ्या बेरीज् , रामफळ, सिताफळ, लक्ष्मण फळ, हनुमान फळ, लाल, पांढरा, जांभळा कृष्ण कमळ, अंजीर च्या झाडाला पेरूची फांदी, घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आंबा, फणस, डाळिंब, चिकु, पपई ने लडबडलेली झाड. घराच्या तिसऱ्या मजल्यावर चंदन, पिंपळ, वड, कडुलिंब, टेंभुर्ण, लाल, पांढरा चाफा, दुसऱ्या मजल्यावर लाल, पांढरी रताळीचा वेल, तोंडली, कारल्याची वेल, जांभळ्या, हिरव्या वांग्याची झाडे जी भरघोस वांग्यामुळे वाकलेली. याव्यतिरिक्त लिंबू, लाल केळी आणि नेहमीची केळी, लिची, चेरी, एका किलोचे एक फळ देणारे आंब्याचे झाड, इतर आंब्यांचे झाडे, हळद, बांगला पान, वावडींग आणि निरनिराळे फुलांची झाडे. बापरे! काय नि काय? देशी विदेशी झाडे च झाडे. दोन्ही मजल्यावरच्या प्रत्येक पॅरापीट भिंतीवरून लोंबकळणारी ड्रॅगन फ्रूट चा वेल.
थांबा! मी स्वप्नातली स्वप्न कथा नाही सांगत आहे. हो! खरोखरच आज मी, मृणालिनी दहिकर आणि माझ्या मुलांनी या किचन गार्डन ची भ्रमंती केली. आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनेल च्या मुलाखती च्या अनुषंगाने. सुप्रियाताई बाकल यांच्या किचन गार्डन ला भेट दिली असता. संपूर्ण गार्डन बघायला आणि समजून घ्यायला किमान दोन तास तरी लागतात. थक्क करणारे त्यांचे झाडावरचे प्रयोग. बघण्यासारखी स्वच्छता आणि व्यवस्थापन. झाडांवर असणारे प्रेम दिसून येते.
अगदी थोड्याश्या जागेत झिरो बजेट वर चालणारे सेंद्रिय भाजीपाल्याचे उगवण आणि संगोपन जवळून बघायला मिळाले. कुठलेही काम आवडीने आणि कष्टाने केल्यावर सुंदर अशी कल्पक निर्मिती तयार होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रियाताई ची बाग.
वैशाली_अलोणे_हिरे
यवतमाळ
८-७-२४
#आम्हालाउमगलेल्यामहिला
#marathi
#maharashtra
#motivation
#garden
#yavatmal
#terresgarden
#SupriyaBakal
#Supriya'skitchengarden

Комментарии

Информация по комментариям в разработке