दक्षिण कोकण🌴चतुर्थी पूर्वीचो शिरोड्याचो कष्टकरी शेतकऱ्यांचो रविवारचो आठवड्याचो बाजार♥️जय वेतोबामाऊली

Описание к видео दक्षिण कोकण🌴चतुर्थी पूर्वीचो शिरोड्याचो कष्टकरी शेतकऱ्यांचो रविवारचो आठवड्याचो बाजार♥️जय वेतोबामाऊली

● दक्षिण कोकणातील शिरोडा हे वेंगुर्ला तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्हातील एक लहानसे गाव आहे. हे गाव मोठा समुद्रकिनारा,सोनेरी वाळू, साप्ताहिक बाजारपेठ (दर रविवारी ), गणेशोत्सव, खारपट्टी, मत्स्य बाजार, जेट्टी, मिठागर, समुद्रकिनाऱ्यावर सुरूची आणि नारळाच्या बाग, छोट्या डोंगररांगांमध्ये तसेच आंबा आणि काजूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
● या गावात श्रीदेवी माऊली देवस्थानचे प्रतिष्ठित गावदेवता, त्यानंतर दत्त मंदिरे, हनुमान मंदिर आणि गिरोबा मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. शिरोडा-आरवली गावात वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिरोडा गावचा समुद्रकिनारा आधी वेळागर आणि आता पॅराडाईज बीच म्हणून प्रसिद्ध आहे या किनाऱ्यावर पांढरी- सोनेरी वाळू पर्यटकांना सुखावते. गोव्यापासून अवघ्या ६-७ किलोमीटरवर असलेले हे गावाला विदेशी पर्यटक सुद्धा पसंती दर्शवतात.
● खेड्यांची सुरुवातीची ख्याती मराठी साहित्यातील विख्यात व्यक्ती वि. स. खांडेकर यांच्याकडून मिळू शकते,ज्यांनी शिरोडा गावाला अनेक दशकांकरिता आपले कार्यस्थळ बनवले.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात मीठ सत्याग्रह चळवळीच्या वेळी शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा विशेष उल्लेख आढळतो.
● शिरोडाहे गाव फिश (मासे) पाककृती आणि विविध मालवणी पदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे, गावातील काही भागात गोवण आणि मालवणी संस्कृतींचा उत्तम मिश्रण मिळू शकतो.
● बाजारपेठे अनेक दुकानांनी समृद्ध आहे इथले स्थानिक, तसेच गोवन व परदेशी पर्यटक सुद्धा या बाजारपेठेला विशेष पसंती दर्शवतात.
● शिरोडा हे गाव गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एस. टी आणि गोवा कदंबा या नियमित बस सेवा इथे उपलब्ध आहे सर्वात जवळचे विमानतळ जरी चिपी (महाराष्ट्र) हवाई तळ असले तरी सध्याचे कार्यात्मक विमानतळ गोव्यात आहे.
●अशा या सर्वांगसुंदर शिरोडा गावचा आठवडा बाजार पहायला कसा वाटला त्याचा अभिप्राय नक्की द्या व व्हिडीओला लाईक व शेअर करून आपले ●आरमारी मराठा● हे युट्युब चॅनेल नक्की subscribe करा हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке