म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari

Описание к видео म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari

म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari


आजपासून सुरू झालेल्या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभवना दिसलेल्या एका दृश्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच काही सेकंदांसाठी दिसलेल्या त्या दृश्यामुळे अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले. त्याचं झालं असं की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे सध्याचे राज्यातील क्रमांक १ चे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आमने सामने आले. एवढंच नाही तर नमस्कार, प्रणामाची औपचारिकता पार पडल्यावर दोन्ही नेत्यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. हा प्रवास अगदी काही सेकंदांचा असला तरी त्यामधून राज्याच्या राजकारणात अनेक संकेत गेले असून, प्रत्येकाकडून आपापल्या परीने त्याचा अर्थ काढत आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून आडमुठी भूमिका घेत महायुती मोडल्यापासून देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या संबंधांमध्ये कमालीची कटुता आलेली आहे. त्यातच भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला प्रोत्साहन देत उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपदासह शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिसकावले. त्यामुळे ठाकरे आणि भाजपामध्ये असलेल्या वादाचे रूपांतर राजकीय हाडवैरात झाले. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले. तसेच पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीच्या रूपात झालेल्या पहिल्याच मोठ्या लढाईत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला निर्णायक मात देण्यात यशस्वी झाले. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसलेलं औपचारिक आणि अनौपराचिक स्वरूपाचं सख्य अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलंय. तसं पाहायला गेल्यास लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला केंद्रात बहुमत न मिळाल्याने आणि महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्याने अनेक समिकरणं बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून भाजपा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. टोकाचे आरोप प्रत्यारोप, संबंधांमध्ये आलेली कटुता या पार्श्वभूमीवर आजही उद्धव ठाकरे हे सोबत आले तर भाजपाला हवे आहेत. त्याची प्रमुख तीन कारणं पुढीलप्रमाणे आहेत...


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#uddhavthackeray
#devendrafadnavis
#sharadpawar
#eknathshinde
#marathinews
#maharashtranews
#latestnews
#latestmarathinews

Комментарии

Информация по комментариям в разработке