Bhavishya Malika 2024: Yogi Adityanath PM, Kaliyug to end काय आहेत चर्चेतल्या भविष्यमालिकाचे अंदाज?

Описание к видео Bhavishya Malika 2024: Yogi Adityanath PM, Kaliyug to end काय आहेत चर्चेतल्या भविष्यमालिकाचे अंदाज?

#BolBhidu #BhavishyaMalika #bhavishyamalikapredictions

बाबा वेंगा, नॉस्ट्रॅडॅमस ही नावं वर्षभर अडगळीत पडलेली असतात, पण डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा यात यांना जोर येतो. कारण तेव्हा बातम्या होतात, बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसनं या वर्षासाठी काय भविष्यवाणी केली होती त्यातलं काय खरं ठरलंय ? आणि पुढच्या वर्षीची भविष्यवाणी काय आहे ? आतापर्यंत हे मार्केट या दोघांचंच होतं, साहजिकच प्रेडीक्शन्सही अमेरिका, इंग्लंड, युरोपमधला एखादा आपल्या जिल्ह्याएवढा देश यांच्यापुरते मर्यादित असायचे.

पण मागच्या वर्षभरापासून यात एक भारतीय नाव ऍड झालंय आणि सगळ्या प्रेडीक्शन्स फिरतायत भारतातल्या घटनांभोवती. म्हणजे एक योगी भारताचा शेवटचा पंतप्रधान असेल, जगन्नाथ पुरी मंदिर पाण्याखाली जाईल आणि कलियुगाचा अंत होईल असे अनेक अंदाज लावलेत, अच्युतानंद दास यांनी, त्यांच्या भविष्यमालिकेतून. आता आपण पेपरमधलं भविष्य बघूनच कामाला जात असलो आणि आपल्या राशीपुढं मनशांती लाभेल असं लिहिलेलं असतानाही बॉस आणि बायको दोघांच्या शिव्या खात असलो, तरी पुढं काय होणार हे जाणून घ्यायचा इंटरेस्ट आपल्यालाही असतोय की. नेमका काय विषय आहे, पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке