मस्त खमंग चटपटीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Leena's Sugrankatta

Описание к видео मस्त खमंग चटपटीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Leena's Sugrankatta

#दुधीभोपळ्याच्यावड्या #वड्या #खमंगदुधीच्यावड्या #स्नॅक्स #पौष्टिकवड्या #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी

दुधी भोपळ्याच्या वड्या
कोवळा दुधी ३५० ग्रॅम
गव्हाचे पीठ दीड वाटी
ज्वारीचे पीठ १ वाटी
बेसन ४ टेबलस्पून
बारीक रवा १ टेबलस्पून
तीळ २ चमचे
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
थोडी कोथिंबीर
हळद १ चमचा
तिखट दीड चमचा
मिरपूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
हिंग पाव चमचा
धणेपूड १ टेबलस्पून
जिरेपूड १ टेबलस्पून
ओवा अर्धा चमचा
साखर १ चमचा
दही २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
तेल ४ चमचे
मोहरी, जिरे, बडीशेप, हिंग, १ हिरवी मिरची, कडीपत्ता, तीळ १ चमचा
वरुन घालायला थोडेसे तिखट व चाट मसाला


दुधीचे साल काढून किसून घ्यावे.
गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन व रवा एकत्र करून त्यात दुधीचा कीस व वरील बाकी सर्व जिन्नस घालून कणिक मळून घ्यावी.
हाताला तेल लावून या कणकेचे होतील तेवढे उंडे करून घ्यावेत.
स्टीमर मध्ये पाणी उकळून घ्यावे.
स्टीमर च्या ताटलीला तेल लावून त्यावर हे उंडे ठेवावेत.
आता ताटली स्टीमर मध्ये ठेवून वरुन झाकण लावून हे उंडे १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावेत.
नंतर हे उंडे पूर्ण गार झाले की त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
एका पातेल्यात फोडणीसाठी दिलेल्या साहित्याची फोडणी करून घ्यावी. त्यात या वड्या घालून लालसर होईपर्यंत परतून घ्याव्यात. थोडी कोथिंबीर घालावी. वरुन तिखट व चाट मसाला भुरभुरावा. आपल्या मस्त चटपटीत दुधी च्या वड्या तयार आहेत.
या वड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता. तसेच जास्तीचे उंडे एअर टाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता.*

Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

Комментарии

Информация по комментариям в разработке