Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)

Описание к видео Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण)

Fishing - पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत पकडले 😍 | Konkan Fishing Vlog (कोकण) कोकणातील गावी गेलो की आमच्या गावच्या भारजा नदीच्या खाडीमध्ये जाऊन मासेमारी करतो. खाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी केली जाते. आम्ही गळाने मासे पकडण्यासाठी गेलो होतो. गाळाने मासे खूप मोठे मोठे लागतात. गणपती उत्सव संपला की खास करून खाडीमध्ये जाऊन मासेमारी केली जाते. गळाने खाडीत मासेमारी करताना गळाला खाद्य लावण्यासाठी खाडीतील कोळंबीचा वापर केला जातो. आम्ही सुरुवातीला गळाला लावण्यासाठी खाडीतली कोळंबी पकडली. कोळंबी पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्याचा वापर केला जातो. गळाने मासेमारी करण्यासाठी आमच्या खाडीवर 'सावलदोडी' हे ठिकाण आहे जिथे आम्ही गेलो होतो. गळाने मासेमारी करताना खूप वेळ द्यावा लागतो. खास पौर्णिमेच्या दोन - तीन दिवस अगोदर ओहोटीच्या वेळेस खाडीत मासेमारी केली जाते. सावलदोडी येथे खडप आहे जिथे पाणी खोल आहे त्यामुळे ओहोटीच्या मोठे मासे भरती येईपर्यंत तिथे येऊन थांबतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मासे गळाला लागतात. वरस मासा, चावरा मासा, गोबरी मासा, पालू मासा, शिंगाडा मासा, बोय मासा, मुतरी मासा, खडपालू मासा, खऊल मासा, बांगडा मासा असे अतिशय चवदार असणारे मासे गळाला लागतात. #Fishing #FishingInCreek #FishingInKonkan #sforsatish
आम्ही गळाने मासेमारी करताना चार प्रकारचे मासे गळाला लागले. माझा भाऊ आणि त्याचे मित्र गळाने मासेमारी करत होते. जवळपास आम्ही 3 तास गळाने मासेमारी केली. बऱ्यापैकी मासे सापडल्यावर आम्ही घराकडे निघालो. एरवी आम्ही गळवायला जायचो परंतु पहिल्यांदाच एवढे मासे गावच्या खाडीत आम्ही पकडले. कोकणात लोकांच्या जेवणात मासे खूप असतात. समुद्रकिनारी, खाडीकिनारी राहणाऱ्या लोकांच्या जेवणात ते जास्तच असते. गावी गेलो की सगळ्या प्रकारचे मासे चाखायला मिळतात. माझ्या गावी अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणांशी बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत त्यातील हे एक ठिकाण जिथे जाऊन आम्ही गळाने मासेमारी करतो. तुम्हाला माझ्या गावी गळाने फिशिंग करायला आवडेल का? चला तर पटापट कमेंट करून सांगा. तुम्हाला आमचा गळाने फिशिंग करायचा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке