कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan)

Описание к видео कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan)

कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan) मासे पकडण्याच्या वेगवेगळ्या कला आहेत. कांडाळीने मासे पकडण्यासाठी आम्ही दरवर्षी जात असतो. कांडाळ हा एक जाळ्याचा प्रकार आहे. कांडाळीने मासे कसे पकडतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. माझा मित्र वैभव भानशे आणि प्रभाकर भानशे आणि नरेश दादा यांनी मला खास मासे पकडायला बोलावले होते. माझ्या गावाच्या बाजूचे गाव जावळे येथे शेतात जाऊन आम्ही मासेमारी केली. कांडाळीने मासे पकडताना जाळे कसे लावतात ते दाखवले आहे. मासे जाळ्यात अडकल्यावर ते मासे कसे पकडायचे, मासे कसे सोडवायचे हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे. कांडाळीने मासे पकडताना खास करून बोय मासा या जाळ्यात सापडतो. पाऊस पडल्यावर कोकणात शेतात पाणी येते, या पाण्यासोबत खाडीतील मासे शेतात चढतात. या माशांना चढणीचे मासे सुद्धा बोलतात. आम्ही कांडाळ लावली तेव्हा पहिल्या फेरीमध्येच आम्हाला बरेच मासे सापडले. साध्या सोप्या पद्धतीने मासे पकडायचे असतील तर कांडाळीने मासेमारी केली जाते. आम्ही जवळपास तीन तास मासेमारी करत होतो. पाऊस येऊन जाऊन होता. मधेच मुसळधार पाऊस येत होता. गावाकडचा आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार झाला आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे आम्हाला शेतात भरपूर मासे सापडले. आम्ही सर्व मासे घेऊन कोंडीवर गेलो. स्वच्छ होऊन मासे किती पडले ते तुम्हाला दाखवले आहे. हे सर्व मासे या मित्रांनी मला बक्षीस म्हणून दिले. मी नकार दिला असताना सुद्धा एकही मासा त्यांनी स्वतः न घेता मला दिले. हे सर्व मासे घरी जाऊन आम्ही शेजारी पाजऱ्या माणसांना वाटले. घरी जाऊन काही मासे फ्राय केले. काही माशांचे वर्षाने कालवण घातले. मासे दिल्यावर आमचे शेजारी सुद्धा खूप खुश झाले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांडाळीने मासे कसे पकडतात तर दाखवले आहे. गावाकडे मासे पकडण्याची मजा या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KandalineFishing #KandalineMaseKasePakdtat #FishingInKonkan #sforsatish


मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке