बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावला | कुसूर पठार | Leopard Attack | Kusur Plateau

Описание к видео बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावला | कुसूर पठार | Leopard Attack | Kusur Plateau

सह्याद्रीच्या एका घाटमाथ्यावर वसलेले पुणे जिल्ह्यातील कुसूर पठार. कुसूर पठारावरील कोंडीबा आखाडे बाबांना मित्रांसोबत भेटायला गेलो तेव्हा समजले कि, एका वासरावर बिबट्याने हल्ला केला आहे.

इतर गुरांनी बिबट्याला पळवून लावले पण वासरू मात्र जखमी झाले. कुसूर पठार च्या जंगलात बिबट्याचे अन्न असलेले इतर वन्यप्राणी सुद्धा आहेत पण वासरू सहज तसेच जास्त मेहनत न करता मिळणार हे बहुदा तेथील बिबट्याला माहीत असावे. बिबट्याला भूक लागल्यावर तो सुद्धा सहजरीत्या मिळणाऱ्या प्रण्यांचीच शिकार आधी करणार.

सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करताना आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. बिबटे, कधीकधी वाघ, तरस यांसारखे प्राणी एकट्या दुकट्या वाटसरूवर हल्ला करतात. तसे अनेक प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे एखाद्या नवीन किंवा अनोळखी ठिकाणी भटकंतीसाठी जाताना स्थानिक गावकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि आसपासच्या परिसराची माहिती घेऊनच जावे.

#leopard #attack #trekking #maharashtra #sahyadri

Комментарии

Информация по комментариям в разработке