कोकणात पारंपारिक पद्धतीने मातीची गणेशमुर्ती घडवणारी "कांबळी बंधु" गणेश चित्र शाळा

Описание к видео कोकणात पारंपारिक पद्धतीने मातीची गणेशमुर्ती घडवणारी "कांबळी बंधु" गणेश चित्र शाळा

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो पावसाळा आला की सणांना पण सुरवात होते. वटपौर्णिमेचा व्हीडीओतर तुम्ही पाहिलाच असेल. आता नागपंचमी येइल व नंतर सगळ्या कोकणवासीयांचा आवडता सण गणेशोत्सव. उत्सवासाठी गणेश मुर्ती बनवण्यास गणेश चित्र शाळेत सुरवात झाली आहे. आज आपण भेट देणार आहोत ते रेवंडी, मालवण गावातील कांबळी बंधुंच्या चित्र शाळेला भेट द्यायला. त्यांची सातवी पीढी आता या चित्रशाळेत सुबक गणेश मुर्ती घडवत आहे. या व्हीडीओमध्ये गणेशमुर्ती कशी घडवली जाते याची पुर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीतजास्त लोकांना हि माहिती मिळेल.
#मालवणीलाईफ
#malvanilife

Music credit-
Keyboardist- Adhetya Kadam
Dholk- Abhi Sarfare

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

Комментарии

Информация по комментариям в разработке