RECENT UPDATE Maharashtra Counseling 2024 | महाराष्ट्र राज्यातील वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया Date आली

Описание к видео RECENT UPDATE Maharashtra Counseling 2024 | महाराष्ट्र राज्यातील वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया Date आली

महाराष्ट्रातीलMBBS /BDS/BAMS/BHMS/BUMS/OTHER वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल
*_________________________________*

भारतात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत दोन प्रकारे प्रवेश होतात.
केंद्राची प्रवेश प्रक्रिया आणि प्रत्येक राज्याची प्रवेश प्रक्रिया.

प्रत्येक राज्य त्यांची प्रवेश प्रक्रिया राबवत असते.

प्रत्येक राज्याने कोणत्या वेळापत्रकात प्रवेश प्रक्रिया राबवावी आणि केंद्राने त्यांची प्रवेश प्रक्रिया कोणत्या वेळापत्रकात घ्यावी याबद्दलचे आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत.

या आदेशाप्रमाणे केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिला राऊंड होतो त्यानंतर किंबहुना सोबतच प्रत्येक राज्यातील प्रवेश प्रक्रियेतील पहिला राऊंड होतो.

याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नॅशनल मेडिकल कमिशन कडून दरवर्षी येत असतात.

दरवर्षी या सूचनांचे, या वेळापत्रकाचे पालन होते. यावर्षी सुद्धा असे वेळापत्रक आलेले आहे. हे वेळापत्रक mcc च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वेबसाईटची लिंक :

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3e0f7a...

या वेळापत्रकाचा अभ्यास केला असता खालील प्रमाणे बोध होतो :

1) केंद्राचा पहिला राऊंड : 14 – 23 Aug

जर कॉलेज मिळाले असेल तर कॉलेज घेण्याची शेवटची तारीख : 29 Aug

2) राज्यांचा पहिला राऊंड : 21 Aug – 29 Aug

जर कॉलेज मिळाले असेल तर कॉलेज घेण्याची शेवटची तारीख : 5 Sept

या वेळापत्रका दरम्यान जर कुठल्याही शासकीय सुट्या, रविवार आले तरी त्या दिवशी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू असते.

📌 या वेळापत्रकावरून असे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 21/22 ऑगस्ट पासून सुरू होईल.

मी याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला अपडेट करेलच.


करिअर मेकिंग गायडन्स
9511791310
9421066225

Комментарии

Информация по комментариям в разработке