Thane इथे Uddhav Thackeray यांच्या गाडीवर MNS कार्यकर्त्यांचा हल्ला, शनिवारी रात्री नक्की काय घडलं ?

Описание к видео Thane इथे Uddhav Thackeray यांच्या गाडीवर MNS कार्यकर्त्यांचा हल्ला, शनिवारी रात्री नक्की काय घडलं ?

#BolBhidu #UddhavThackeray #UddhavThackerayCarAttack

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठी राडेबाजी झाल्याचं पहायला मिळतंय. शुक्रवारी बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपा-या फेकल्या. त्यानंतर २४ तासांत ठाण्यात मनसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला चढवला. ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याआधी मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ, शेण, टोमॅटो, बांगड्या अशा वस्तू मारून मोठा राडा केला. तसंच गडकरी रंगायतन इथे ५० ते ६० मनसैनिकांनी शिरुन मोठ-मोठ्यानं घोषणा द्यायला सुरुवात केली. मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आल्यानंतर तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

या राड्यानंतर आता राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दोन्ही बाजूनं एकमेकांवर टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर ही अँक्शनला रिअँक्शन होती, असं म्हटलंय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ल्याची सुपारी दिल्लीतल्या अहमदशहा अब्दालीकडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. शनिवारी रात्री ठाण्यात नक्की काय घडलं, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला कसा करण्यात आला आणि त्यावरुन आता काय प्रतिक्रिया येतायंत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке