शेतातून आणली दारची भाजी - चुलीवरची पालेभाजी | गावाकडचा निसर्ग | Kokan vegetables | Kokankar Avinash

Описание к видео शेतातून आणली दारची भाजी - चुलीवरची पालेभाजी | गावाकडचा निसर्ग | Kokan vegetables | Kokankar Avinash

शेतातून आणली दारची भाजी - चुलीवरची पालेभाजी | गावाकडचा निसर्ग | Kokan vegetables | Kokankar Avinash

कोकणामध्ये पावसाळयात बऱ्याच रानभाज्या, पालेभाज्या खाल्ल्या जातात. त्यातील एक अतिशय लोकप्रिय, पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये दारची भाजी बनवली जाते. थोड्याफार प्रमाणात माटाच्या भाजीप्रमाणे दिसणारी ही भाजी माटापेक्षा थोडी वेगळी असते. कोकणात खास करून पावसाळ्यात ही भाजी दाराजवळ वा घराच्या मागच्या परसात लावतात त्यामुळे या भाजीला दारची भाजी असे बोलतात. या भाजीचे बीज अतिशय बारीक काळ्या रंगाचे असते. जवळपास पाऊस संपेपर्यंत म्हणजे सराय (शेत कापणीच्या) हंगामा पर्यंत ही भाजी कोकणात खाल्ली जाते. कोकणात पाऊस मुबलक प्रमाणात पडतो त्यामुळे तिथे बऱ्याच पालेभाज्या तयार होतात. इतर मोसमात पाणी तेवढे नसल्यामुळे ह्या पालेभाज्या तेवढ्या नाही खाल्ल्या जात. या भाज्या इतर मोसमात थोड्या कडवट लागतात असा लोकांचा समज आहे. या भाज्या बाराही महिने केल्या जाऊ शकतात परंतु दारची भाजी खाण्याचा योग्य मोसम तो म्हणजे पावसाळ्यात. नाचणीची तांदळाची गरमा गरम भाकरी आणि चुलीवर तव्यात वा कढईत तयार केलेली दारची भाजी म्हणजे काही तोडच नाही. ही दारची भाजी अतिशय पौष्टिक, रुचकर, चवदार, शरीराला आरोग्यवर्धक अशी भाजी कोकणात प्रत्येक घरात बनत असते.

आज मयुरी अवनी मी आणि आई गेलो शेतावर, शेतात जाऊन दारची भाजी काढली. घरी जाता जाता सुन्या काकींकडे जाऊन आलो. घरी येऊन मयुरीने भाजी मस्त साफ केली. धुवून घेतली आणि छान कापून चुलीवर फोडणी दिली. या भाजीत कोणत्याही प्रकारचे मसाले टाकत नाहीत. दुपारच्या जेवणामध्ये दारची भाजी आणि तांदळाची भाकरी खाल्ली.

#KokanVegetables #Palebhaji #forestvegetables

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 22 July 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________
दारची भाजी :-
गावाकडे परसावणात किंवा शेतात हि भाजी सर्रास पेरली जाते. या भाजीच्या रोपाचा खोड गुलाबी रंगाचा असतो. दर ९ १० दिवसांनी भाजीची पाने खुडल्यावर पुन्हा त्या देठांना नवीन पाने येतात अशी दाराजवळ लावलेली ही दारची भाजी 4 महिने तरी कोकणात खालीच जाते. गणपती सणामध्ये गौरी जेव्हा घरी येतात तेव्हा गौरीला नैवद्य दारची भाजी आणि भाकरीचा असतो. बऱ्याच काळापासून कोकणात ही दारची भाजी लोकांच्या जेवणात आहे. अतिशय सोप्या पद्धतीने, कोणत्याही प्रकारे मसाले ना घालता ही दारची भाजी तयार केली जाते. गावी कोकणात गेलो की आई आम्हाला ही दारची भाजी बनवून देतेच देते आणि आम्ही अतिशय आवडीने ही भाजी भाकरीसोबत खातो. आज मयुरीने भाजी बनवली. तुम्हाला दारच्या भाजीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका!

कोकणातल्या रानभाज्या
पावसाळी रानभाज्या
आरोग्यदायी रानभाज्या
ranbhaji
ranbhaji recipe in marathi
ranbhajya
Darji bhaji
Kokan Forest Vegetables
Konkan Forest Vegetables
kokan ranbhaji
konkan ranbhaji
ranbhajya in marathi
पावसाळ्यातील कोकण रानभाजी
__________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке