सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)

Описание к видео सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel)

सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel) आम्हाला आपले सबस्क्राईबर यांनी त्यांच्या घरी येण्यासाठी निमंत्रण दिले होते. आपले सबस्क्राईबर हे आपल्या चॅनलचे सदस्य म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यच आहेत. आपले हर चॅनल केवळ चॅनल नसून एक कुटुंब आहे. बऱ्याच दिवसापासून पनवेलमधील भाताण गावातील सरपंच साहेब यांनी आम्हाला सहकुटुंब घरी भेटायला बोलावले होते. सरपंच साहेब यांच्या घरचा पाहुणचार आम्हाला अनुभवायला मिळाला. आम्ही एक दिवस असेच प्रांजु प्रदनु आणि वर्षा भाताण या त्यांच्या गावी भेटायला गेलो. आम्ही पनवेलमध्ये राहतो तर आम्हाला भाताण गाव जवळच आहे. आम्ही रविवारी भाताण या त्यांच्या गावी घरी भेटायला गेलो. सरपंच साहेब सुभाष भोईर साहेब त्यांचे सर्व कुटुंबीय आपले सर्व व्हिडीओ पाहतात. आम्हाला त्यांच्या कुटुंबाचा एक भागच समजतात. आपल्या चॅनलचे व्हिडीओ नेहमी त्यांच्या घरी लागलेले असतात. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा सुद्धा घरी आपले व्हिडीओ ते पाहत होते. सुभाष भोईर साहेब गेल्या तीन वर्षांपासून भाताण गावचे सरपंच आहेत. त्यांचे वडील आदरणीय बाबा हे सुद्धा भाताण गावचे माजी सरपंच आहेत. #SarpanchSahebanchyaGharachaPahunchar #SarpanchPahunchar #BhatanPanvel #sforsatish
आम्ही सुभाष साहेबांच्या घरी पोहोचलो तेव्हा प्रांजु आणि प्रदनु खूप खुश झाले. भाताण गावात सरपंच सुभाष साहेबांचा बंगला आहे. प्रांजु आणि प्रदनुचे खूप लाड केले. घरातील सर्व माणसांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला.आम्ही सर्वांनी एकत्र चहा नाश्ता केला. भोईर साहेबांसोबत जवळ असलेली अमिटी युनिव्हर्सिटी कॅम्पस बघायला गेलो. भाताण गाव पाहिले. भाताण गावातील मंदिरे पाहिली. सुभाष साहेब आणि त्यांचे कुटुंबीय एवढे प्रेमळ आहेत की विचारू नका. त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या, आम्ही एकमेकांचे विचार शेअर केले, खूप गप्पा केल्या. एकत्र आम्ही सगळेजण जेवलो. जेवणात खास करून वहिनींनी आगरी पद्धतीचे चिकन सुक्का, मटण रस्सा बनवला होता. सोबत पुऱ्या सुद्धा केल्या होत्या. आम्ही सर्वजण पोटभर जेवलो. घरच्यासारखे वातावरण आम्हाला मिळाले. युट्युबरवर काम करून अशी प्रेमळ माणसे कमावली यात आमचे यश आहे असे आम्ही मानतो. वहिनींनी वर्षाची खास श्रीफळ साडी देऊन ओटी भरली. आम्हा सर्वांना गिफ्ट दिले. संध्याकाळी आम्ही भोईर कुटुंबीयांचा निरोप घेऊन पुन्हा आमच्या घरी यायला निघालो. खूप प्रसन्न आणि आनंदित आमचा दिवस गेला. ही आमची भेट कायम स्मरणात राहील. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सरपंच साहेब यांच्या घरचा पाहुणचार दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке