Waqf Board Bill In Parliament: Waqf board चे नक्की अधिकार काय आहेत ? नविन विधेयकानुसार काय बदलणार ?

Описание к видео Waqf Board Bill In Parliament: Waqf board चे नक्की अधिकार काय आहेत ? नविन विधेयकानुसार काय बदलणार ?

#BolBhidu #WaqfBoardAmendmentBill #waqfact

देशात वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता हा कायमंच वादग्रस्त मुद्दा राहिलाय. वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने आता या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेत सादर केलं. विधेयकाचा उद्देश केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता, संपत्तीची नोंदणी करण्यात सुलभता आणण्याचा आहे. पण, या विधेयकावरुन आता वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय.

वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी या दुरुस्ती विधेयकावर आक्षेप नोंदवला आहे. संविधानाने लोकांना दिलेल्या धर्म आणि मुलभूत हक्कांवर हा थेट हल्ला आहे असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. हा धार्मिक स्वातंत्र्यांवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर आधीपासूनच केलाय. आज आपण माहिती घेऊया वक्फ म्हणजे नेमकं काय, वक्फ बोर्डाचे नक्की अधिकार काय आहेत आणि नवीन दुरुस्ती विधेयकात नेमक आहे काय?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке