भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 13 फायदे || Health benefits of Soaked Peanuts in Marathi

Описание к видео भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 13 फायदे || Health benefits of Soaked Peanuts in Marathi

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 13 फायदे || Health benefits of Soaked Peanuts in Marathi

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 13 फायदे

1. भिजवलेल्या शेंगदाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, लोह, कॅल्शियम, सेलेनियम इत्यादी पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात असतात.

2. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

3. शेंगदाण्यात असलेले कॅल्शियम, प्रथिने व जीवनसत्वे शरीरातील स्नायूंना योग्य आकार प्रदान करतात, स्नायू मजबूत बनवतात.

4. भिजवलेल्या शेंगदाण्यात फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते.

5. भिजवलेले शेंगदाणे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास पोटात गॅस होणे, पित्त होणे यांसारख्या समस्या होत नाहीत.

6. दृष्टी सुधारण्यासाठी म्हणजेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील भिजवलेले शेंगदाणे अवश्य खावेत.

7. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते. म्हणूनच बौद्धिक काम अधिक असणाऱ्या व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी ते अवश्य खावेत.

8. भिजवलेले शेंगदाणे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात. एनिमिया असणाऱ्यांनी तर शेंगदाणे न चुकता दररोज गुळसोबत खावेत.

9. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास दिवसभर ताजेतवाणे वाटेल इतकी ऊर्जा मिळते.

10. सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असणाऱ्यांनी तर भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन अवश्य करावे.

11. दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर (blood sugar) नियंत्रणात राहते. परिणामी मधुमेह म्हणजेच डायबिटीस पासून बचाव होतो.

12. हिवाळ्यात भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला आतून गर्मी आणि ऊर्जा मिळते.

13. भूक न लागणे, ओला खोकला या समस्या भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने दूर होतात.

14. भिजवलेले शेंगदाणे महिलांमधील कॅन्सर होण्यापासून बचाव करतात.

15. गर्भवती महिलांसाठी देखील भिजवलेले शेंगदाणे खाणं आरोग्यदायी असतं.

16. जेवणानंतर मूठभर भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर खाल्लेले व्यवस्थित असते, रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीर मजबूत बनते.

व्हिडिओ आवडला तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
THANK YOU

Комментарии

Информация по комментариям в разработке