यमाई माता औंध गावी कशी प्रकट झाली? यमाई देवी औंध | Yamai Devi Temple - Aundh, Satara

Описание к видео यमाई माता औंध गावी कशी प्रकट झाली? यमाई देवी औंध | Yamai Devi Temple - Aundh, Satara

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
यमाई माता औंध गावी कशी प्रकट झाली?

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे संस्थान. पंतप्रतिनिधींच्या काळात हे संस्थान नावारूपाला आले आणि येथील इतिहास काळाच्या पटलावर कोरला गेला. याच संस्थानाच्या मुख्य ठिकाणी या आदिशक्तीचा वास आहे. महाराष्ट्रातील या आदिमायेचे महत्त्वाचे स्थान म्हणजे माहूर. याच माहूरच्या रेणुकेची अनेक स्थाने आहेत. कर्नाटकमधील सौंदत्ती या ठिकाणी जगदंबा 'येल्लमा' म्हणून ओळखली जाते. येल्लमाची उत्पत्ती योळ (म्हणजे ७) आणि अम्मा (म्हणजे माता), म्हणजेच सप्तमातृकांवरून झाली असावी आणि त्यावरून यमाई नाव पडले असावे, असे काही सांगतात. यमुनाचल पर्वतावरची देवी म्हणून 'यमाई' हे नाव रास्त असल्याचे, काही विद्वान म्हणतात.  देवीची औंध संस्थानात दोन ठिकाणे आहेत. एक औंध गावात आणि दुसरे औंधच्या जवळ असलेल्या डोंगरावर स्थित मूळपीठ. ज्योतिबाच्या सांगण्यावरून औंधासूराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी देवी विसावली, ते मूळपीठ. औंधासूराचा वध या ठिकाणी केल्याने या भागाला औंध हे नाव पडले. सुमारे ४३२ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेले हे मंदिर दोन फूट उंच जगतीवर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून, १० बुरुज आहेत. मुख्य द्वार उत्तरेस आहे. मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे देवीसमोर नंदी आहे. चतुर्भुज अंबिकेची मूर्ती भव्य असून, सुमारे सहा फूट उंचीची आहे. काळ्या पाषणातील या भागवतीने हातात त्रिशूळ, गदा, बाण, पानपात्र धरण केले आहे.
देवीचे दुसरे मंदिर औंध गावात आहे. मंदिर पंतप्रतिनिधींच्या वाड्याजवळ आहे. संस्थानचा राजदरबार भगवतीसमोर भरत असे. हे मंदिर भगवान पंतप्रतिनिधींनी बांधल्याचा उल्लेख आहे. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रांगणात चार दीपमाळा असून, त्यातील एक भव्य आहे. सुमारे ६५ फूट उंचीच्या या दीपमाळेवर १७६ दिवे लावता येतात. मंदिराचा सभामंडप लाकडी असून, सुमारे ६५ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आल्याचे समजते. दगडी गाभाऱ्यात देवीची कळ्या पाषाणाची मूर्ती आहे. ती चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे. पंचधातूचीही एक मूर्ती आहे. मंदिर परिसरात मोकळाई देवीचेही मंदिर आहे. देवीने केस मोकळे सोडून येथे असलेल्या जलाशयात स्नान केल्यामुळे हे नाव पडले, असे सांगतात.पंचमीला रथोत्सवाने वासंतिक उत्सवाची सांगता घडते. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. या उत्सवादरम्यान गोंधळी, डबरी, सफाई करणारे लोक, दिवट्या धरणारे यांना सेवेचा हक्क असतो. असाच देवीचा मोठा उत्सव पौष महिनात भरतो. औंधासूराच्या वधाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हा उत्सव केला जातो. देवीची यथासांग पूजा, छबिना, रथ काढला जातो. या वेळी लावल्या जाणाऱ्या दीपमाळेचे दृश्य मनात साठवण्यासारखे असते.
There are two temples of Yamai devi in Aundh, Satara.
1) Main temple which is situated in hill top Named - Yamai Devi Temple - hill top.
2) New temple is based in village Named - Yamai Devi Temple - Village.
यमाई देवी कोण आहे?
Who is the goddess Yamai?

#yamaimata
#yamai
#yamaidevi
#yamaimataaudh
#yamaitemple
#yamaimandir
#marathimotivationandhistory
#shardiya_navratri_2024
#navratrispecial
#navratrifast
#dussehra
#festivalspecial
#ghatsthapna2024
#navratri2024
#navratrispecial
#sadettin
#shaktipeeth
#shaktipeetha
#maharashtratemples
#maharashtra
_________________________________________________________________________
✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛[email protected]
_____________________________________________________________________________________________

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии

Информация по комментариям в разработке