Deepstambh Manobal Diwali 2024 || Yajurvendra Mahajan

Описание к видео Deepstambh Manobal Diwali 2024 || Yajurvendra Mahajan

आशेच्या ज्योतीने उजळलेली दिवाळी: दीपस्तंभचा प्रेरणादायी प्रकाशोत्सव
२६ ऑक्टोबर रोजी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात दिव्यांग, अनाथ आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळी आणि प्रकाशपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. जे डोळ्याने प्रकाश बघू शकत नाही अश्या अंध विद्यार्थ्यांमधील ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन करण्यासाठी ‘प्रकाशपुजन’ या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव होता, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन, रत्नाभाभी जैन, पुखराजभाऊ पगारिया, नयनतारा बाफना आणि आकाशवाणीचे प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. अतिथींनी विद्यार्थ्यांसोबत दिप प्रज्वलित करून ‘प्रकाशपूजन’ साजरा केला.
दीपस्तंभच्या जळगाव आणि पुणे येथील दिव्यतेज टीमने गायन आणि वादन सादरीकरण करून कार्यक्रमात संगीतमय रंग भरला. नाजनीन आणि उद्देश कोटावर यांनी सुंदर गीत सादर केले, तर चैतन्य पानवलकर याने बासरी वादन आणि अमित पन्हाळे याने मृदंग वादन करून रसिकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांच्या आणि नृत्य सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात स्नेह, आपुलकी आणि आनंदाची भावना निर्माण केली.
कार्यक्रमात सुरेश दादा व रत्ना भाभी जैन यांनी एका विद्यार्थ्याच्या वार्षिक खर्चासाठी देणगी दिली. प्रशांत आणि पूनम चोरडिया यांनी भोजनासाठी देणगी दिली, आणि अमिषा डाबी यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना नवीन कपडे देण्यात आले. सुषमा आणि विष्णुकांत मणियार यांनी मनोबल प्रकल्पासाठी एक लाख रुपयांचे योगदान दिले. सुरेशदादा जैन यांनी दीपस्तंभच्या जागतिक स्तरावरील कार्याची प्रशंसा करत त्याला जळगावसाठी अभिमानास्पद ठरवले.
या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच संस्थेच्या हितचिंतकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. मनोबल प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या या दिवाळीच्या सोहळ्याने आशेचा नवा दीप प्रज्वलित केला.
Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
Contact - 83800 33390

Visit Deepstambh Website
http://www.deepstambhfoundation.org/

Follow us on Facebook
  / deepmanobal  

Follow us on Instagram
https://www.instagram.com/deepstambhm....

@Deepstambh Foundation
@Deepstambh UPSC-MPSC Lectures

#diwali
#disability
#visually_impaired isually impaired
#blindnessawareness
#disabled
#handicapstudent
#Blindstudentseducation
#blind
#Manobal
#ngo
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
#diwali
#deepstambhupscmpsclectures
#maharashtrabhushan
#दीपस्तंभफाऊंडेशन
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech

Комментарии

Информация по комментариям в разработке