Chhagan Bhujbal यांनी OBC Vs Maratha वादात आक्रमक होण्यामागे भाजप आहे की Sharad Pawar ?

Описание к видео Chhagan Bhujbal यांनी OBC Vs Maratha वादात आक्रमक होण्यामागे भाजप आहे की Sharad Pawar ?

#BolBhidu #chhaganbhujbal #OBCvsMaratha

छगन भुजबळ. एक आक्रमक नेते. मंडल आयोगाच्या निमित्ताने त्यांनी शिवसेना सोडली. ज्या काळात बाळासाहेबांवर टिका करण्याचं कोणाचच धाडस नव्हतं अशा काळात भुजबळांनी बाळासाहेबांचा टि बाळू असा उल्लेख करत मुर्तीभंजन करण्याचं काम केलं...अर्थात भुजबळ किती आक्रमक होते व आक्रमक कृती करताना ते मागेपुढे पहात नव्हते हाच भुजबळांचा इतिहास. पण जेव्हा तेलगी प्रकरण बाहेर आलं त्यानंतर मात्र भुजबळ शांत झाले. एकूण 786 दिवस भुजबळांना जेलमध्ये रहावं लागलं. या काळात व्हायरल झालेला त्यांचा तो फोटो पाहून भुजबळ संपल्याच्या चर्चा सर्वदूर झाल्या. पण भुजबळ बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मात्र भुजबळ कमालीचे शांत होते. त्यांच्या राजकीय महत्वकांक्षा देखील संपूष्टात आल्याचं दिसत होतं. दिलेलं मंत्रीपद घेणं यापलीकडे भुजबळांच्या महत्वकांक्षा दिसून आल्या नाहीत…

मात्र अजित दादांच बंड झालं आणि पुन्हा एकदा भुजबळांची तीच आक्रमकता समोर आली. पहिल्यांदा त्यांनीच शरद पवारांवर थेट टिका करण्यास सुरवात केली. त्यानंतर मराठा आरक्षणाचा वाद चिघळला आणि आपलं OBC राजकारण घेवून भुजबळ पुन्हा मैदानात उतरले...पण खरच दिसतं तितकं सोप्प आहे, कारण भुजबळांच्या मागे चौकशीचा फेरा अजूनही आहे. जेलमध्ये गेलं तर काय होतं याची जाणीव देखील भुजबळांना आहे. कदाचित याच कारणामुळे भुजबळ बाहेर येवूनही शांत होते, मात्र पवारांची छत्रछाया गेली आणि भुजबळ पुन्हा आक्रमक झालेत साहजिक प्रश्न पडतो इतक्या चौकशीचा फेरा शिल्लक असताना, राजकीय कारकिर्द संपवली जाण्याची भिती पुन्हा असताना देखील भुजबळ इतकी टोकाची भूमिका कशी काय घेवू शकतात. नक्कीच भुजबळांच्या मागे कोणतरी असेल? जर असेलच तर कोण?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке